FIH World Rankings: भारतीय महिला हॉकी संघाने मारली बाजी; पुरुष संघाची घसरण

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (International Hockey Federation) सोमवारी क्रमवारीका जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women Hockey Team) बाजी मारली असून संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (International Hockey Federation) सोमवारी क्रमवारीका जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women Hockey Team) बाजी मारली असून संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र पुरूष हॉकी संघाला या क्रमवारीत बाजी मारता आली नाही. भारतीय पुरुष संघाची (Indian Men’s Hockey Team) एका स्थानानं घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

महिलांच्या क्रमवारीत अर्जेंटिनाचा संघ (26744.837) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया (2440.750) तिसऱ्या स्थानावर तर इंग्लंड (2204.590) चौथ्या स्थानवर आहे. तसेच, जर्मनी (2201.085) पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाने (2029.396) एका स्थानाने आघाडी घेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, या क्रमवारीत स्पेन (2016.149) सातव्या स्थानावर आहे. यानंतर बेल्जियम, न्यूझीलंड आणि जपानचा संघ टॉप 10 मध्ये आहे.

भारतीय पुरूष संघ चौथ्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या क्रमवारीत पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (2842.258) (Australia) आणि नेदरलँड (3049.495) (Netherlands) संघ अव्वल स्थानावर आहेत. नेदरलँड्सने (2465.707) FIH प्रो लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे भारतीय संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

या क्रमवारीत बेल्जियमचा संघ (2764.735) दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत जर्मनी (2308.156) पाचव्या स्थानावर आहे. फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवणारा इंग्लंडचा संघ सहाव्या (2171.354) स्थानावर पोहोचला आहे. अर्जेंटिनाच्या संघाची सातव्या (2147.179) स्थानावर घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड, स्पेन आणि मलेशिया पहिल्या 10 मध्ये आहेत.


हेही वाचा – खेळपट्टी आणि मैदान तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर