प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मालकीच्या पबला आग; स्वत: ट्विट करत दिली माहिती

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) मालकीच्या पबला (Pub fire) आग लागून मोठं नुकसान झाले आहे. याबाबत स्टुअर्ट ब्रॉडने स्वतः ट्विट करता माहिती दिली आहे. 'टॅप अँड रन' (Tap and Run) असं त्याच्या पबचं नाव आहे.

England

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) मालकीच्या पबला (Pub fire) आग लागून मोठं नुकसान झाले आहे. याबाबत स्टुअर्ट ब्रॉडने स्वतः ट्विट करता माहिती दिली आहे. ‘टॅप अँड रन’ (Tap and Run) असं त्याच्या पबचं नाव आहे. इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायर शहरात हा पब आहे. या पबला पुरस्कारही मिळाला आहे. (fire breaks out in tap and run pub of england cricketer stuart broad)

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जूनच्या रात्री ३ वाजताच्या सुमारास या पबला आग लागली. या आगीत पबचे छत (Pub roof fire) जळून खाक झाले आहे. तसेच ट्विट करत त्याने पबला लागलेल्या आगीची माहिती दिली. तो म्हणाला की, “पबला पहाटे आग लागली. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. नॉटिंगहॅमशायर अग्नीशमन दलाने आणि आजूबाजूच्या नागरिकांनी खूप मदत केली. मी त्यांचा ऋणी आहे”, असे ट्विट ब्रॉडने केले आहे. पबच्या अधिकृत वेबसाइटवर या आगीबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज

या आगीमुळे काही दिवस हा पब बंद राहणार आहे. यापूर्वी करण्यात आलेली सर्व बुकिंग्ज रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त अन्य किती तरी व्यवसायात स्टुअर्ट ब्रॉड गुंतवणूक करत असतो. यामधला पब हा एक बिझनेस आहे. मात्र आता या आगीमुळे स्टुअर्टचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क लावून खेळले सामना, प्रेक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा

सद्यस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्टने दोन विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा पहिला डाव ५५३ धावांवर आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने दोन विकेट्स गमावून १०७ धावा केल्या आहेत.


हेही वाचा – नुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही ट्विट करत दिली प्रतिक्रिया, म्हणाले