घरICC WC 2023बंगळुरूमध्ये भारतीय खेळाडूंकडून चौकार-षटकारांची आतषबाजी; नेदरलँड्स समोर 411 धावांचे आव्हान

बंगळुरूमध्ये भारतीय खेळाडूंकडून चौकार-षटकारांची आतषबाजी; नेदरलँड्स समोर 411 धावांचे आव्हान

Subscribe

बंगळुरू : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवाळीच्या मुहूर्तावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 विकेट गमावत 410 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Fireworks of fours sixes by Indian players in Bangalore Challenge of 411 runs in front of Netherlands​)

हेही वाचा – Rohit Sharma : 61 धावांच्या खेळीत अनेक पराक्रम; डिव्हिलियर्स, गांगुली, मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला

- Advertisement -

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने शुभमन गिलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी रचली. यानंतर शुभमन गिल 51 धावा करून बाद झाला आणि थोड्याच वेळात रोहित शर्माही 61 धावा करून बाद झाली. यानंतर विराट कोलहीने श्रेयस अय्यरसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी रचली. मात्र विराट कोहली 51 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी 208 धावांची भागिदारी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला.

- Advertisement -

श्रेयस अय्यरने 94 चेंडूंत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 128 धावांची खेळी केली. त्याने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. याशिवाय केएल राहुलने 64 चेंडूंत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. त्याने 62 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे शतक भारतासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले.

हेही वाचा – ‘त्या’ बैठकीत काय घडले होते? मिस्बाहचा मोठा खुलासा, बाबर आझम आणि कोचवर केले गंभीर आरोप

कर्णधार रोहितने 61 आणि शुभमन गिल आणि विराट कोहलीने प्रत्येकी 51 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघाने 4 विकेट गमावत 410 धावांचा डोंगर उभा केला. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा केल्या होत्या. नेदरलँड्सकडून जस्ट डी लीडेने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या, तर मीकरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -