Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा आधी IPL, आता के.एल. राहुल WTCच्या भारतीय संघातूनही बाहेर होण्याची शक्यता

आधी IPL, आता के.एल. राहुल WTCच्या भारतीय संघातूनही बाहेर होण्याची शक्यता

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत सामना खेळत असताना लखनऊ संघाचा कर्णधार के. एल. राहुल याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चेन्नई विरूद्धच्या सामन्यात देखील त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत सामना खेळत असताना लखनऊ संघाचा कर्णधार के. एल. राहुल याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चेन्नई विरूद्धच्या सामन्यात देखील त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुखापत मोठी असल्याने के. एल. राहुल पुढील महिन्यात 7 जूनपासून इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळले की नाही याबाबत सुद्धा शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे तो WTCच्या भारतीय संघातूनही बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(First IPL, now K.L.Rahul is also likely to out of Indian team for WTC PPK)

हेही वाचा – कोहली आणि नवीनच्या राड्यात पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची उडी, वाद वाढण्याची शक्यता?

- Advertisement -

बंगळुरूच्या विरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये मार्कस स्टोयनिसच्या चेंडूवर फाफ प्लेसिसने कव्हर ड्राईव्ह मारला. त्यावेळी तो चौकार रोखताना राहुलला गंभीर दुखापत झाली. राहुल आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीनंतर गुरुवारी (ता. 04 मे) स्कॅनसाठी मुंबईत येणार आहे. पण आजच्या सामन्यात तो नसल्याने लखनऊ संघात चिंता निर्माण झाली आहे. तर कृणाल पांड्या आज लखनऊ संघाचे नेतृत्व करत आहे. तर wtc च्या सामन्यांसाठी सुद्धा भारतीय संघाला विकेटकीपर शोधावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या ipl मध्ये के. एल. राहुल हा म्हणावी इतकी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तर ipl च्या आधी भारतीय संघाच्या झालेल्या सामन्यात देखील त्याने नीट खेळी केली नव्हती, ज्यामुळे संघातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली होती. पण तरी सुद्धा त्याची wtcच्या अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. पण आता झालेल्या या गंभीर दुखापतीमुळे तो खेळण्याची शक्यता कमी झालेली आहे.

- Advertisement -

के. एल. राहुल याच्या आधीच संघातील चार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झालेले आहेत. यामध्ये शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. त्यामुळे आता के. एल. राहुल सुद्धा दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

WTC फायनलसाठीचा भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

- Advertisment -