घरक्रीडाफुटबॉलपटू सोफियान लॉकरला सामन्यादरम्यान ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात निधन

फुटबॉलपटू सोफियान लॉकरला सामन्यादरम्यान ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात निधन

Subscribe

अल्जेरियन फुटबॉलपटू सोफियान लुकरला सामन्यादरम्यान धक्का लागल्याने ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सोफियान लुकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी देशांतर्गत खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या विभागाच्या सामन्यात खेळत होता. या सामन्यात गोलकीपरला धक्का लागून जमिनीवर पडला. त्यानंतर लुकरला ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपाचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर सोफियानचा मृत्यू झाला आहे.

२८ वर्षीय सोफियान लुकर एएसएम ओरान विरुद्ध मौलोदिया सईदाकडून खेळत होता. ब गटांतर्गत खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचा दुसरा हाफ सुरु होता. यादरम्यान सोफियानची त्याच्या गोलकीपरशी टक्कर झाली अन् खाली पडला यानंतर त्याच्यावर मैदानात उपचार करण्यात आला. थोडावेळानंतर तो पुन्हा मैदानात खेळण्यासाठी आला होता.

- Advertisement -

सोफियान पुन्हा मैदानात आल्यावर १० मिनिटांनी खाली कोसळला यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सोफियानचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. सोफियान त्याच्या संघाचा कर्णधार होता. मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर सदर फुटबॉलचा सामना देखील रद्द करण्यात आला. सोफियानच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सहकाऱ्यांनाही रडू कोसळले होते.


हेही वाचा : India Vs South Africa Test Match: सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे मौन, हातावर बांधली काळीपट्टी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -