घरक्रीडाऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन 

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन 

Subscribe

सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत समालोचन करण्यासाठी म्हणून जोन्स हे मुंबईमध्ये होते.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत समालोचन करण्यासाठी म्हणून जोन्स हे मुंबईमध्ये होते. ते आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीसाठी काम करत होते. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. जोन्स हे ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू असले, तर त्यांचे भारतीय क्रिकेट चाहत्यांशी वेगळे नाते होते. ते गेली अनेक वर्षे आयपीएलमध्ये समालोचन करत होते. तसेच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचेही ते नेहमी कौतुक करायचे.

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास नाश्ता करून झाल्यानंतर त्यांनी आयपीएल प्रसारण करणाऱ्या वाहिनीच्या चर्चा सत्रात सहभाग घेतला. तसेच ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये इतर समालोचकांशीही संवाद साधत होते. मात्र, ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे त्यांना लगेच अँब्युलन्समधून गिरगाव येथील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -