घरक्रीडामॅथ्यू हेडन २-३ वर्ष माझ्यासोबत बोलणे टाळत होता; उथप्पाने सांगितला किस्सा 

मॅथ्यू हेडन २-३ वर्ष माझ्यासोबत बोलणे टाळत होता; उथप्पाने सांगितला किस्सा 

Subscribe

टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप स्लेजिंग करत होते.

रॉबिन उथप्पा हा भारताच्या सर्वात स्टायलिश फलंदाजांपैकी एक मानला जातो. उथप्पाने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जवळपास सहा वर्षांपूर्वी खेळला होता. परंतु, त्याआधी त्याने भारताकडून काही चांगल्या खेळी केल्या होत्या. तसेच तो २००७ टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत महेंद्रसिंग धोनीच्या भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यादरम्यान उथप्पा आणि भारताच्या अन्य काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला प्रत्युत्तर दिले होते. हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फारसे आवडले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा त्यावेळचा सलामीवीर मॅथ्यू हेडनने त्यानंतर दोन-तीन वर्षे उथप्पासोबत बोलणे टाळले होते. याबाबतचा किस्सा उथप्पाने सांगितला.

ऑस्ट्रेलियाने केली स्लेजिंग

टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप स्लेजिंग करत होते. मलाही स्लेज केले गेले. केवळ झहीर खान आणि अन्य काही वेगवान गोलंदाज त्यांच्या स्लेजिंगला प्रत्युत्तर देत होते. आमचे फलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हुज्जत घालणे टाळत होते. मात्र, त्यांनी जास्तच स्लेजिंग करण्यास सुरुवात केल्याने गौतीने (गौतम गंभीर) सर्वात आधी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अँड्र्यू सायमंड्स, मिचेल जॉन्सन आणि ब्रॅड हॅडीन यांच्या स्लेजिंगला मीसुद्धा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र, मला मॅथ्यू हेडनला काहीही बोलणे अवघड जात होते, असे उथप्पा म्हणाला.

- Advertisement -

प्रत्युत्तर देणे भाग पडले

हेडन हा माझा आदर्श होता. मात्र, त्या सामन्यात मला हे सर्व विसरावे लागले. हेडन फलंदाजी करत होता आणि त्यादरम्यान त्याने मला स्लेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नाइलाजाने मला प्रत्युत्तर देणे भाग पडले. तो मला स्लेज करताना जे बोलला, ते मी लोकांसमोर सांगू शकत नाही. परंतु, मीसुद्धा त्याला उलटून उत्तर दिले. हे त्याला फारसे आवडले नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षे त्याने माझ्याशी बोलणे टाळले. तो माझा आदर्श होता. त्यामुळे तो माझ्याशी बोलत नसल्याचे मला खूप दुःख होते, असेही उथप्पाने एका मुलाखतीत सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -