घरक्रीडाजग जिंकायचय? 'या' खेळाडूला करा भारताचा नवा कर्णधार; रवी शास्त्रींचा BCCI ला...

जग जिंकायचय? ‘या’ खेळाडूला करा भारताचा नवा कर्णधार; रवी शास्त्रींचा BCCI ला सल्ला

Subscribe

हिट-मॅन रोहित शर्माची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माला जास्त काळ भारतीय संघाचा कर्णधार राहता येणार नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत काही काळानंतर बोर्डाला नवीन कर्णधाराची गरज भासू शकते. परंतू, अशा परिस्थितीत भारताला चांगला आणि प्रभळ कर्णधार मिळावा यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही नाव सुचवली आहेत.

हिट-मॅन रोहित शर्माची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माला जास्त काळ भारतीय संघाचा कर्णधार राहता येणार नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत काही काळानंतर बोर्डाला नवीन कर्णधाराची गरज भासू शकते. परंतू, अशा परिस्थितीत भारताला चांगला आणि प्रभळ कर्णधार मिळावा यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही नाव सुचवली आहेत. रवी शास्त्री यांना नुकतंच प्रशिक्षक पदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यांची जागा राहुल द्रविड यांनं घेतली.

रवी शास्त्री ‘इएसपीएन’ला दिलेल्या मुलाखतीत ‘भविष्यात लवकरच भारतीय क्रिकेट संघाला नव्या कर्णधाराची गरज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आता युवा खेळाडू राहिलेले नाहीत. त्यामुळं बोर्डाला पुढील काही वर्षात भारताचा पुढील कर्णधार निवडावा लागेल’ असं म्हटलं. शिवाय, ‘आयपीएल २०२२ मध्ये भारताला पुढचा लाँग टर्म कर्णधार मिळेल’ असंही शास्त्री यांनी म्हटलं.

- Advertisement -

दरम्यान, रवी शास्त्री यांनी संभाव्य ३ खेळाडूंची नावं घेतली आहे, जे रोहित शर्मानंतर भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतात. त्यानुसार, शास्त्री यांनी श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल या तिघांची नावे घोषित केली आहेत. हे खेळाडू टीम इंडियाच्या भवितव्यासाठी चांगले ठरतील, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला. ‘विराट कोहली आता कर्णधार राहिलेला नाही. तर रोहित शर्मा हा केवळ वनडे क्रिकेटसाठी सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. त्यामुळं भविष्यात भारतीय संघाला नव्या कर्णधाराती गरज भासणार आहे.

नुकतंच सर्व फॉरमॅटमधील कर्णधार पदाची जबाबदारी विराटकडून रोहित शर्माच्या खांद्यावरती आली आहे. मात्र असं असलं तरी रोहित शर्मा हा ३४ वर्षांचा आणि विराट कोहली हा ३३ वर्षाचा आहे. या वयात मोठ-मोठ्या खेळाडूंना फिटनेसवर अधिक लक्ष्य देणं गरजेचं असून, यावेळेत अनेक खेळाडू हे निवृत्तीची तयारी करत असतात. त्यामुळं ७-८ वर्षांचाच विचार केला असता, रोहितला अधिक काळासाठी कर्णधार ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा नव्या कर्णधाराचा शोध घेतला जाऊ शकतो. आणि त्यावेळी सध्याच्या भारतीय संघातील यष्ठीरक्षक रिषभपंत हा योग्य खेळाडू ठरू शकतो.

- Advertisement -

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत हा रोहित शर्मानंतर नवा कर्णधार होण्याचा मोठा दावेदार आहे. पंत आता अवघ्या २४ वर्षांचा असून, त्याने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली. पंतने फार कमी वेळात भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तो अजूनही तरुण आहे आणि त्याच्याकडे अजून दीर्घ कारकीर्द बाकी आहे. त्यामुळं तो कोणत्याही खेळाडूपेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकतो.

२०२१ मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक गमावला नतर कोहलीने स्वत:हून टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला. मग त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधार पदावरुनही काढण्यात आले. त्यानंतर त्याने कसोटीचेही कर्णधार पद सोडले. भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण? त्यासाठी एकच नाव समोर येत होते ते म्हणजे रोहित शर्मा. त्यानंतर आपसुकच या सर्व फॉरमॅटमधील कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आली.


हेही वाचा – ICC Women’s World Cup 2022: नो बॉल पडला भारी, भारत विश्वचषकातून बाहेर, आफ्रीकेचा शेवटच्या चेंडूवर विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -