IND vs SA : जसप्रीत बुमराहला उपकर्णधार पद, माजी क्रिकेटपटूने उडवली टिकेची झोड

Team India Bumrah ready to lead Indian Test team
Team India : भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वासाठी बुमराह तयार, म्हणाला संधी मिळाल्यास सन्मान...

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सेंन्च्यिुरियन कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवत एक चांगली सुरूवात टीम इंडियाने केली आहे. कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज राहणार आहे. हिटमॅन रोहित शर्माला गंभीर दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाचा वेगवान फलंदाज केएल राहुलकडे कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास दिली. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, बुमराहला उपकर्णधार केल्यामुळे टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे.

जसप्रीत ऐवजी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देतील, असं क्रिकेट प्रेमींना वाट होतं. परंतु बुमराहकडे जबाबदारी दिल्यामुळे ही आश्चर्याची बाब असल्याचं माजी क्रिकेटपटूने म्हटलं आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली निवड समितीने धक्कादायक निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

अय्यर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कर्णधारपद सांभाळत होता. तसेच त्याला अनुभव देखील दांडगा आहे. परंतु वेगवान बुमराहने मागील काही वर्षांमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

मी विश्वासच ठेवू शकत नाही

माजी क्रिकेटर सबा करीम ही आश्चर्याची गोष्ट असल्याचं सांगत म्हणाले की, मी खूप हैराण झालो. जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद सांभाळण्यास देणं म्हणजे आश्चर्याची बाब..मी विश्वासच ठेवू शकत नाही. मला वाटलं ऋषभ पंतला उपकर्णधार करतील. कारण त्याचं क्रिकेटमधील प्रदर्शन उत्तम आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. आम्ही पाहत आहोत की, तो सामन्याला कशाप्रकारे समजून घेतो. त्याच्याजवळ खेळामधली शैली आहे.

जसप्रीत बुमराह सुद्धा टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याने याआधी कधीही कर्णधारपद सांभाळलेलं नाहीये. त्यामुळे ही गोष्ट आश्चर्यचकीत करणारी वाटते. मला वाटत होतं की, उपकर्णधार पदाचा दावेदार ऋषभ पंत होता.

दरम्यान, बुमराह हा शांत आणि संयमी आहे. त्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु हा योग्य निर्णय असल्याचं प्रसाद म्हणाले आहेत.

असा असेल टीम इंडियाचा संघ –

केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, प्रसिध कृष्णा


हेही वाचा : शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे