घरक्रीडाभारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

यशपाल शर्मा हे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे आवडते फलंदाज होते

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma)  यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  (Former India cricketer Yashpal Sharma dies of heart attack) वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  भारताच्या एका महान खेळाडूच्या निधनाने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यशपाल शर्मा १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट निवड समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी निभावली होती. यशपाल शर्मा यांनी भारतासाठी एकूण ३७ टेस्ट मॅच आणि ४२ वनडे क्रिकेट सामने खेळले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये २ शतकांसह १६०६ धावा केल्या होत्या. तर वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी ८९ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

१९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशपाल शर्मा यांनी पाकिस्तान विरोधात सियालकोटमध्ये वन डे सामना खेळला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्यांनी क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर यशपाल शर्मा यांनी १९५५ साली इंग्लंड विरुद्ध चंदीगडमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर १९८३मध्ये दिल्लीत वेस्ट इंडीज विरुद्धा शेवटचा कसोटी सामना खेळला.

- Advertisement -

 

यशपाल शर्मा यांच्याकडे एक उत्तम फलंदाज म्हणून पाहिले जात होते. भारताच्या विश्वचषक स्पर्धेत यशपाल यांचा मोलाचा वाटा होता. इंग्लंडच्या बॉब विलीसला मारलेला षटकार आजही लोकांच्या लक्षात आहे.

 

दिलीप कुमार यांचे आवडते फलंदाज

यशपाल शर्मा हे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार  यांचे आवडते फलंदाज होते. ‘माझी कारकिर्द दिलीप कुमार यांनी घडवली’, असे यशराज शर्मा नेहमी म्हणत असत. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतरही यशपाल शर्मा यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. दिलीप कुमार यांनी यशराज यांची १९७४-७५ सालची रणजी सामन्यात सलग दोन शतके खेळलेल्या सिरीज पाहिल्या होत्या. दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध झाला होता . त्यानंतर दिलीप कुमार यांनी यशपाल यांचे नाव राज सिंह दुंगारपूर यांना सांगितले होते. त्यानंतर यशपाल यांच्या कारकिर्दीला दमदार सुरुवात झाली. दिलीप कुमार यांच्या नंतर त्यांचा आवडता फलंदाज गेल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे.

क्रीडा क्षेत्रातून श्रद्धांजली

यशपाल शर्मा यांच्या निधनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा क्षेत्रातून यशपाल शर्मा यांच्या निधनांतर अनेक खेळाडू आणि चाहत्यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.


हेही वाचा – शेफाली, स्नेह राणाला मागे टाकत इंग्लंडच्या एकलेस्टोनने पटकावला आयसीसीचा पुरस्कार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -