आयपीएल 2023मध्ये पोलार्ड मुंबईच्या संघात नसणार?, भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणतो…

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात (Indian Premier League) मुंबई इंडियन्सच्या संघाताली खेळाडून कायरन पोलार्डला (Kieron pollard) अष्टपैलू (All-Rounder) कामगिरी करता आली नाही. सततच्या खराब फॉर्ममुळे आयपीएलच्या 2023मध्ये (IPL 2023) मुंबईचा संघ पोलार्डला रिटेन करेल का, अशी चर्चा होत होती.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात (Indian Premier League) मुंबई इंडियन्सच्या संघाताली खेळाडून कायरन पोलार्डला (Kieron pollard) अष्टपैलू (All-Rounder) कामगिरी करता आली नाही. सततच्या खराब फॉर्ममुळे आयपीएलच्या 2023मध्ये (IPL 2023) मुंबईचा संघ पोलार्डला रिटेन करेल का, अशी चर्चा होत होती. यावर आता भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने आपले मत मांडले आहे. “मुंबई इंडियन्स (MI) आयपीएलच्या पुढील पर्वासाठी कायरन पोलार्डला रिटेन करणार नाही”, असे मत आकाश चोप्राने मांडले.

आकाश चोप्रा (Aakash chopra) त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “पुढच्या पर्वात मुंबई इंडियन्स पोलार्डला रिटेन करणार नाही. पोलार्डसह फिरकीपटू मुरुगन आश्विन, टायमल मिल्स यांनाही मुंबई रिलीज करेल. शिवाय, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यालाही रिटेन करण्याबाबत काहीही सांगता येत नाही”, असे आकाश चोप्रा म्हणाला.

मुंबई इंडियन्सचे आव्हान साखळी सामन्यातच संपुष्ठात

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान साखळी सामन्यातच संपुष्ठात आले. मुंबईच्या संघातील फलंदाज सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोन खेळाडूं व्यतिरीक्त इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. त्याशिवाय, मुंबईने एकूण 14 पैकी 10 सामने गमावले असून, सततच्या पराभवामुळे मुंबईचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिला.

हेही वाचा – वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबईच्या संघाने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आयपीएलचा तगडा संघ यंदा मात्र गुणतालिकेत तळाशी राहिला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनीही मोठी नाराजी व्यक्त केली. तर काही चाहत्यांनी मुंबईच्या पराभवाला सपोर्ट करत, ‘बेटर लक नेक्स्ट टाइम’, असे म्हटले. त्यामुळे पुढच्या पर्वात मुंबई आयपीएलचे जेतेपद पटकावणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – IPL 2022: ‘अपना टाईम आएगा…’, भाऊ अर्जुनसाठी सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट

अर्जुनचे पदार्पण लांबणार

दरम्यान मुंबईच्या संघाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यालाही यंदाच्या पर्वात स्थान दिले नाही. गतवर्षी मुंबईने (Mumbai) त्याला विकत घेतले होते. परंतु, दोन्ही पर्वात खेळण्याची संधी न मिळाल्याने अर्जुनचे पदार्पण अजून लांबणार आहे.


हेही वाचा – Asia Cup Hockey: भारताने इंडोनेशियाला केले पराभूत; नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित