घरक्रीडामॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते माजी हॉकीपटू एमके कौशिक यांचे कोरोनामुळे निधन

मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते माजी हॉकीपटू एमके कौशिक यांचे कोरोनामुळे निधन

Subscribe

कौशिक यांना १९९८ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर २००२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

भारताचे माजी हॉकीपटू आणि हॉकी प्रशिक्षक एमके कौशिक यांचे आज (शनिवारी) निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. कौशिक हे मागील तीन आठवडे कोरोनाला झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. १७ एप्रिलला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाले, असे त्यांचा मुलगा एहसानने सांगितले. कौशिक हे १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होते. त्यांना १९९८ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर २००२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पुरुष आणि महिला दोन्ही संघांना प्रशिक्षण

तसेच त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही खूप यश संपादन केले. त्यांनी भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही राष्ट्रीय हॉकी संघांचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय पुरुष हॉकी संघाने १९९८ साली बँकॉक येथे झालेल्या एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच २००६ दोहा एशियाडमध्ये महिला संघाला कांस्यपदक जिंकण्यात यश आले होते.

- Advertisement -

रवींदर पाल सिंह यांचेही कोरोनामुळे निधन

कौशिक यांच्याप्रमाणेच १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग असलेल्या रवींदर पाल सिंह यांचेही आज कोरोनामुळे निधन झाले. रवींदर पाल यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचीही कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -