घरक्रीडामिताली राज हिची T-20 मधून निवृत्ती जाहीर

मिताली राज हिची T-20 मधून निवृत्ती जाहीर

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार असून मिताली राजने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

- Advertisement -

मिताली राजने भारताकडून ८८ टी-२० सामन्यांचे नेतृत्त्व केले आहे. टी-२० करिअरमध्ये ३७.५२ च्या सरासरीने तिने २३६४ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे.

हेही वाचा –

मुंबईतील CSMT जगातील २रे आश्चर्यकारक रेल्वे स्थानक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -