घरक्रीडाअफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पाकिस्तानचा प्रशिक्षक; 'हा' खेळाडू देणार प्रशिक्षण

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पाकिस्तानचा प्रशिक्षक; ‘हा’ खेळाडू देणार प्रशिक्षण

Subscribe

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूची निवड केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान संघाच्या (Afghanistan Cricket Team) गोलंदाजांना उत्तम प्रशिक्षण (Bowling Coach) देण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूची निवड केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यापासून गुल नवीन आपल्या कामाची सुरुवात करणार आहे. या दौऱ्यात अफगाणिस्तान (Afghanistan) तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी (T-20) सामने खेळणार आहे.

अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक चांगले फिरकीपटू तयार झाले आहेत. परंतु, त्यांच्याकडे पाहिजे तेवढे चांगले वेगवान गोलंदाज नाहीत. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे. उमर गुलने यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये अफगाणिस्तानच्या प्रशिक्षण शिबिरात गोलंदाजी सल्लागार म्हणून कार्य केले होते. त्यानंतर आता त्याची पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. शिवाय, इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, उमर गुल हा पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाज होता. पाकिस्तानसाठी एकूण १३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्ये त्याने विशेष कामगिरी केली होती. १३० वनडे सामन्यांमध्ये गुलने १७९ बळी घेतलेले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ पाकिस्तानी खेळाडूचा विराट कोहलीला सपोर्ट

उमर गुल हा २००७ आणि २००९ या दोन्ही आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. २०२० मध्ये उमर गुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा निर्णय घेतला होता. निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले.


 हेही वाचा –  LSG vs RCB : रजत पाटीदारची शतकीय खेळी, लखनौ संघासमोर २०८ धावांचे आव्हान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -