घरक्रीडापाकिस्तानच्या माजी कर्णधाराने अर्जुन तेंडुलकरवर टीका करताना सचिनला ऐकवले

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने अर्जुन तेंडुलकरवर टीका करताना सचिनला ऐकवले

Subscribe

नवी दिल्ली : अर्जुन तेंडुलकरला आयपीएल (IPL) पदार्पणाची संधी मिळाली असून तो आपल्या गोलंदाजीने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) टीका करताना जोरदार टीका करताना सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ऐकवले आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या 16 व्या हंगामात पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी करत आपल्या दुसऱ्याच सामन्यात कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आणि चर्चेचा विषय ठरला. क्रिकेट विश्वातून अर्जुन तेंडुलकरचे कौतुक होत असताना पाकिस्तानच्या माजी कर्णधार रशीद लतीफने अ(Rashid Latif) र्जुन तेंडुलकरवर टीका केली आहे. त्याच्या मते अर्जुन तेंडुलकरमध्ये वेगाचा अभाव असून त्याची लाईनलेंथ चुकीची आहे. अर्जुनचा दृष्टीकोन वेगळा असता सचिन ज्या फ्रँचायझीमध्ये आहे त्या संघाकडून तो खेळला नसता.

- Advertisement -

रशीद लतीफला वाटते की, अर्जुन कधीही आपला वेग वाढवू शकणार नाही. त्याला मार्गदर्शनाची गरज असून बायोमेकॅनिकल तज्ञाची त्याला आवश्यकता आहे. अर्जुन सध्या त्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये आहे. त्याला अजून खूप मेहनत करावी लागेल. त्याला गोलंदाजी वेग वाढवण्यासाठी आपली अलाईनमेंट योग्य करावी लागेल. यासाठी एखाद्या चांगल्या बायोमेकॅनिकल सल्लागाराने अर्जुनला मार्गदर्शन केले पाहिजे. असे केल्याने त्याचा गोलंदाजी वेग वाढू शकतो. प्रशिक्षण देणे आणि खेळाडूमध्ये बदल करणे, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. सचिन स्वतः अर्जुनच्या बाबतीत ते करू शकला असता, पण त्याने अर्जुनला देशांतर्गत क्रिकेटवर अवलंबून राहायला लावले, असा आरोप रशीद लतीफने केला आहे.

अर्जुनचा पाया मजबूत नाही
अर्जुन गोलंदाजी करताना धावत येऊन जेव्हा क्रीजमध्ये पाय ठेवतो तेव्हा त्याचा पाय आत येण्याऐवजी बाहेर जातो. यामुळे त्याचे संतुलन बिघडते आणि त्याच्या वेगावर परिणाम होतो. तो एक चांगला फलंदाज आहे. तो १३५ किमी प्रतितास वेग गाठू शकतो आणि तो २-३ वर्षात एक चांगला खेळाडू बानू शकतो, असे रशीद लतीफला वाटते.

- Advertisement -

…त्याची वृत्ती वेगळी असती
रशीद लतीफ वाटते की, अर्जुन तेंडुलकर जर सचिन नसलेल्या इतर कोणत्याही फ्रँचायझीसाठी खेळत असता तर त्याची वृत्ती वेगळी असती. जर तो सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत असता, तर त्याची वृत्ती खूप वेगळी असती. सध्या सचिन तेंडुलकर (वडील) ड्रेसिंग रूममध्ये असतो, परंतु सचिनची अर्जुनच्य़ा आयुष्यात फक्त वडिलांची भूमिका असायला हवी होती, असे रशीद लतीफला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -