Mahila Jaivardhan : माजी कर्णधार महेला जयवर्धनेची श्रीलंकन संघाच्या सल्लागार प्रशिक्षक पदी नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने माजी कर्णधार माहेला जयवर्दनेची १ जानेवारी २०२२ पासून एका वर्षासाठी राष्ट्रीय संघाचा सल्लागार प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

श्रीलंका क्रिकेटने माजी कर्णधार माहेला जयवर्दनेची १ जानेवारी २०२२ पासून एका वर्षासाठी राष्ट्रीय संघाचा सल्लागार प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंका क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनानुसार, जयवर्दने राष्ट्रीय संघाशी संबंधित सर्व क्रिकेट प्रकाराचा प्रभारी असेल आणि ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’मध्ये खेळाडू आणि व्यवस्थापन संघाला तो महत्त्वाच्या सूचना आणि सल्ला देईल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षक असलेले जयवर्दने यांना श्रीलंका क्रिकेटच्या तांत्रिक सल्लागार समितीशी सल्लामसलत केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने ही भूमिका सोपवली आहे.

श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲशले डी सिल्वा यांनी म्हंटले की, “आम्हाला खूप आनंद होत आहे की माहेलाचा राष्ट्रीय संघात मोठ्या स्थानावर समावेश होत आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि या संदर्भात त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे.”

यूएईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी जयवर्दनेची श्रीलंकेचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत १४९ कसोटी आणि ४४८ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. त्याने आणखी म्हंटले की, श्रीलंकेच्या “अंडर-१९ आणि अ’ संघांसह आमच्या विविध संघांच्या राष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांसोबत काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. माझ्या संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक आणि हितचिंतक स्टाफ सदस्यांना मदत करणे ही माझी मुख्य भूमिका असेल.”

“मला श्रीलंकेच्या क्रिकेटबद्दल खूप आवड आहे आणि मला विश्वास आहे की सर्व वयोगटांसह परस्पर समन्वय आणि सर्वांना एकत्रित ठेवून, आम्ही भविष्यात सतत यश मिळवू शकतो. असे जयवर्दनेने म्हंटले. जयवर्दने सध्या वेस्ट इंडीजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी अंडर-१९ संघाची तयारी करण्यात आपली भूमिका बजावत आहे. त्याच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली असूनही तो ही भूमिका निभावणार असल्याचे श्रीलंका क्रिकेटतर्फे सांगितले.


हे ही वाचा :  http://IND vs SA : आफ्रिका दौऱ्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेबाहेर