टी-20 मध्ये कायरन पोलार्डचा विश्वविक्रम; ‘इतके’ सामने खेळणारा ठरला पहिलाच खेळाडू

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडून कायरन पोलार्डने टी-20 मध्ये विश्वविक्रम केला आहे. क्रिकेटच्या टी- 20 फॉरमॅटमध्ये 600 टी-20 सामने खेळणारा पोलार्ड हा जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. पोलार्डने 2006 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

kieron pollard
विंडीजच्या विजयात कर्णधार किरॉन पोलार्डची चमक

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडून कायरन पोलार्डने टी-20 मध्ये विश्वविक्रम केला आहे. क्रिकेटच्या टी- 20 फॉरमॅटमध्ये 600 टी-20 सामने खेळणारा पोलार्ड हा जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. पोलार्डने 2006 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पोलार्डच्या नव्या विक्रमामुळे चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. (Former West Indies player Kieron Pollard 1st to play 600 T20 matches)

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड सध्या The Hundred लीगमध्ये लंडन स्पीरिट संघाकडून खेळत आहे. लंडन स्पीरिट आणि मँचेस्टर ओरिजन्स यांच्यात मंगळवारी लॉर्ड्सवर टी-20 सामना झाला. या सामन्यात पोलार्डने 11 चेंडूंत नाबाद 34 धावांची केल्या. त्याच्या या खेळीत १ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी ट्वेंटी-२० क्रिकेमध्ये विश्वविक्रम केला. पोलार्ड सध्या The Hundred लीगमध्ये लंडन स्पीरिट संघाकडून खेळतोय आणि त्याने मंगळवारी मँचेस्टर ओरिजन्स संघाविरुद्ध 11 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 1 चौकार व 4 षटकार मारत 31 धावा केल्या. याच सामन्यात पोलार्डने आपला 600 वा सामना खेळत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

पोलार्डने 600 टी-20 सामन्यांत 533 डावांमध्ये 31 च्या सरासरीने 11723 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक व 56 अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने 780 षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर 309 विकेट्सही आहेत.

2006 मध्ये पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक टी-20 लीगमध्ये सहभाग घेतला. पोलार्डने गतवर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व सांभाळले होते. परंतु त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. मात्र निवृत्तीनंतर पोलार्ड फ्रँचायझी लीगमध्ये खेळत आहे.

100 चेंडूच्या या सामन्यात लंडन स्पीरिटने 6 बाद 160 धावा केल्या. झॅक क्रॅवलीने 41 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल (21), कर्णधार इयॉन मॉर्गन (37) आणि पोलार्ड (34*) यांनीही चांगली फटकेबाजी केली.

लंडन स्पीरिट संघाने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मँचेस्टर ओरिजनल्स संघ 98 चेंडूंत 108 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी फिल सॉल्टने सर्वाधिक 36 धावा केल्या. जॉर्डन थॉम्सनने 21धावांत 4 विकेट्स घेतल्या. मेसन क्रेन व लिएम डॉसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.


हेही वाचा –  राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले खेळाडू भारतात येताच विमानतळावर जल्लोषात स्वागत