U-19 World Cup: झिम्बाब्वेच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण

वेस्ट इंडिजमध्ये १४ जानेवारी २०२२ पासून आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२२ला सुरूवात होणार आहे. परंतु या वर्ल्डकप आधीच झिम्बाब्वेच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या चार खेळाडूंनी २ जानेवारी रोजी बारबाडोसमध्ये आयरलॅंड विरूद्ध झालेल्या अंडर-१९ सामन्यामध्ये सहभाग घेतला होता. या दोन्ही संघामध्ये चार वनडे सामने खेळवण्यात आले होते. परंतु या चारही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून त्यांना विलगीकरण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

सेंट किट्स अँण्ड नेविस संघासोबत खेळण्याआधी त्यांचे पहिले परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ आणि ११ जानेवारी रोजी कॅनडा आणि बांगलादेश विरूद्ध ही टीम सामना खेळणार आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट(जेडसी)ने सांगितलं की, झिम्बाब्वे क्रिकेट कोरोना बाधित झालेल्या चार खेळाडूंच्या कोरोनाबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. जे वेस्टइंडिजमध्ये आयसीसी अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२२ मध्ये सहभाग घेणार होते. त्याच ग्रूप ‘सी’ मध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचाही समावेश होता.

२२ जानेवारी रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे झिम्बाब्वेचा शेवटचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १५ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


हेही वाचा : Bully Bai App Controversy: बंगळुरूनंतर उत्तराखंडमधून एक महिला ताब्यात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई