घरक्रीडा'हा' खेळाडू करतो प्रत्येक मॅचनंतर १६ लाखांचे दान

‘हा’ खेळाडू करतो प्रत्येक मॅचनंतर १६ लाखांचे दान

Subscribe

फ्रान्सचा फॉरवर्ड खेळाडू १९ वर्षीय कायलन एमबापे जगातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू असून प्रत्येक मॅचनंतर तो तब्बल १६ लाख रूपये सामाजिक कार्यासाठी दान करतो

सध्या फुटबॉलचा फिफा विश्वचषक रशियात दिमाखात सुरू आहे. विश्वचषचकातील सामन्यासोबतच इतर गोष्टीही बऱ्याच लोकप्रिय होतात. मग ते खेळांडूंचे आपआपसातील वाद असो किंवा त्यांची हेअरस्टाईल. सर्वच गोष्टींना फुटबॉलप्रेमी अगदी डोक्यावर घेतात. कित्येकांसाठीतर त्यांचे आवडते फुटबॉलपटू हे त्यांचे आदर्श असतात. त्यामुळे फुटबॉलपटू ऑनफिल्ड सोबतच ऑफफिल्ड कशी कामगिरी करतो हेही तितकेच महत्वाचे असते. फ्रान्सचा उगवता स्टार फुटबॉलपटू कायलन एमबापे सध्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करतोय मात्र विशेष म्हणजे तो प्रत्येक मॅच नंतर तब्बल १६ लाख रूपये दान करतो त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

kylin
कायलन एमबापे

फ्रान्सचा फॉरवर्ड खेळाडू १९ वर्षीय कायलन एमबापे जगातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू असून त्याची सध्याच्या विश्वचषकातील कमाई ही प्रचंड आहे. विश्वचषकातील एका मॅचची कायलन याची कमाई २०,००० युरोस (भारतीय १६लाख रुपये) इतकी आहे. अर्जेंटिनाविरूद्धच्या मॅचमधून विश्वचषकात पदार्पण केलेल्या कायलने आपल्या सलामी सामन्यात २ गोल केले आणि संघाला विजय मिळवून दिला. ऑनफिल्डच्या या अप्रतिम कामगिरीनंतरच कायलनने मॅचमधील सर्व कमाई सामाजिक कार्यासाठी दान करून ऑफफिल्डही एक चांगला व्यक्ती असल्याची प्रचिती दिली आहे.

- Advertisement -

कायलन एमबापे हा सध्या लीग -१ मधील पॅरिस-सेन्ट जर्मन या क्लब साठी खेळतो. त्याने २०१७ मध्ये फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. विश्वचषकातील गटनिहाय सामन्याच पेरूविरुद्ध गोल त्याने पहिला गोल केला असून तो विश्वचषकात फ्रान्सकडून गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. कायलनच्या अप्रतिम खेळामुळे फ्रान्सने अर्जेंटिनावर विजय मिळवला. कायलनने केवळ चार मिनिटाच्या काळात म्हणजे ६४ व्या आणि ६८ व्या मिनिटाला दोन गोल करत सामना जिंकवून दिला.

kaylin vs argentina
अर्जेंटिनाविरूद्ध सामन्यात कायलन

कायलनने केलेल्या या देणगीमुळे त्याचा सर्व जगभरातून कौतुक होत आहे. जगातील त्याची फॅन-फॉलोविंगही झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारे पोस्ट देखील दिसून येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -