घरक्राइमबँक ऑफ महाराष्ट्रमधील घोटाळ्याप्रकरणी 'या' भारतीय क्रिकेटपटूचे पिता तुरुंगात

बँक ऑफ महाराष्ट्रमधील घोटाळ्याप्रकरणी ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे पिता तुरुंगात

Subscribe

शेतकऱ्यांच्या नावे खोटी किसान क्रेडिट कार्ड बनवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या आरोपाखाली त्यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाचा रिमांड सुनावला आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू (Indian Former Cricketer) आणि विकेटकीपर फलंदाज नमन ओझा (Naman ojha) याच्या वडिलांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. विनय ओझा असे त्यांचे नाव आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank Of Maharashtra) माध्यमातून सव्वा कोटी रुपये हडपल्याच्या आरोपाखील त्यांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावे खोटी किसान क्रेडिट कार्ड बनवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या आरोपाखाली त्यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाचा रिमांड सुनावला आहे. (fraud case of bank of maharashtra former cricketer naman ojha father vinay ojha arrested)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) बैतूल येथील मुलताई मधून विनय ओझा (Vinay ojha) यांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. ग्राम जौलखेडाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank Of Maharashtra) शाखेमध्ये ते पदावर होते. तत्कालिन बँक मॅनेजरवर फसवणूक आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

हेही वाचा – येत्या काळात एकाच वर्षात दोन वेळा आयपीएल?, ‘या’ खेळाडूने दिला खास प्लॅन

दरम्यान, मागील काही काळापासून या प्रकरणी पोलीस विनय ओझा यांच्या मागावर असून, यासंदर्भात आणखी शोध घेत होते. अखेर ६ जून रोजी संध्याकाळी त्यांचा शोध लागला असून पोलिसांनी त्यांना अटक केली. बैतूल येथील मुलताईमधून विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

२०१३ साली जौलखेडा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये अभिषेक रत्नन हे बँक मॅनेजर होते. त्यावेळी मॅनेजर अभिषेक रत्नन, विनय ओझा आणि अन्य काही आरोपींनी मिळून बनावट नाव आणि फोटोंच्या आधारे किसान क्रोडिट कार्ड बनवले. या कार्डच्या माध्यमातून त्यांनी बँकेतून पैसे मिळवले. बँकेतून पैसे काढल्यानंतर बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, विनय ओझा, लेखपाल निलेश छलोत्रे, दीनानाथ राठोरसह अन्य आरोपींनी रक्कम आपसात वाटून घेतल्याची माहिती मिळते.

या घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अभिषेक रत्नम, विनय ओझा, निलेश छलोत्रे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कलम 409, 420, 467,468, 471, 120 बी आणि आयटी कायदा कलम 65,66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तत्कानिल बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, निलेश छलोत्रे यांना आधीच अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार होते. सोमवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.


हेही वाचा – न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -