घरक्रीडाNovak Djokovic : नोवाक जोकोविच विना लसीकरण फ्रेंच ओपन खेळू शकतो, फ्रांसच्या...

Novak Djokovic : नोवाक जोकोविच विना लसीकरण फ्रेंच ओपन खेळू शकतो, फ्रांसच्या क्रीडा मंत्र्यांचे मोठं विधान

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी जोकोविचला नियमांचा पाठ शिकवला आहे. जोकोविचचा व्हिजा रद्द करण्यात आला आहे. तसेच नियम नियम आहे. खासकरुन जेव्हा आमच्या योजनांवर प्रश्न उपस्थित होत असतील तर योजनांहून महत्त्वाचे कोणी नाही असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले आहेत.

जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिजा रद्द केला आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं असून कोर्टाच्या निकालानंतर जोकोविच ऑस्ट्रेलिय ओपन खेळणार की नाही हे समजणार आहे. परंतु या वादामध्ये आता फ्रांसच्या क्रीडा मंत्र्यांनी उडी घेतली आहे. फ्रांसच्या सरकारने जोकोविचला विना लसीकरण फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याची ऑफर दिली आहे. याबाबतची माहिती फांसचे क्रीडामंत्री रोक्सेन मारासिनेनु यांनी दिली आहे. फ्रांस दुसऱ्या देशातून येणाऱ्या विना लसीकरण प्रवाशांवर निर्बंध लादत नाही आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या देशाच्या तुलनेत अधिक कठोर निर्बंध देशात लागू केले आहेत.

फ्रांसचे क्रीडा मंत्री रोक्सेन मारासिनेनु यांनी म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या प्रमुख आयोजनांमध्ये प्रोटोकॉलचा अर्थ असा आहे की, लस न घेतलला खेळाडूही मे महिन्यात सुरु होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकतो. जोकोविचचे नाव लसीकरण झालेल्या यादीत नाही आहे. मात्र तरिही रोलैंड गैरोसमध्ये खेळण्यास पात्र ठरु शकतो.

- Advertisement -

नोवाक जोकोविच त्याचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवत नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने व्हिजा रद्द केला आहे. हा निर्णय मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया ओपनपूर्वी आरोग्य तपासणीच्या सवलतीमध्ये घेण्यात आला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि सर्बियाचे राजकीय संबंध बदलण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी जोकोविचला नियमांचा पाठ शिकवला आहे. जोकोविचचा व्हिजा रद्द करण्यात आला आहे. तसेच नियम नियम आहे. खासकरुन जेव्हा आमच्या योजनांवर प्रश्न उपस्थित होत असतील तर योजनांहून महत्त्वाचे कोणी नाही असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : IND vs SA: पराभवानंतर केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न, रहाणेला संधी देण्याची माजी खेळाडूची मागणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -