Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा French Open : १७ वर्षीय कोको गॉफ पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व...

French Open : १७ वर्षीय कोको गॉफ पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी गॉफ ही मागील १५ वर्षांतील सर्वात युवा टेनिसपटू ठरली.

Related Story

- Advertisement -

अमेरिकेची १७ वर्षीय टेनिसपटू कोको गॉफने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही गॉफची पहिलीच वेळ ठरली. तसेच ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी गॉफ ही मागील १५ वर्षांतील सर्वात युवा टेनिसपटू ठरली. उपांत्यपूर्व फेरीत गॉफसमोर चेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रेसीकोव्हाचे आव्हान असेल. क्रेसीकोव्हाने उप-उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या सलोन स्टिफन्सचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. या सामन्याच्या पहिल्याच सेटमध्ये क्रेसीकोव्हाने स्टिफन्सची सर्व्हिस दोन वेळा मोडली.

सुरुवातीपासून आक्रमक खेळ

कोको गॉफने ट्युनिशियाच्या ऑन्स जाबेऊरचा ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या स्पर्धेत गॉफला २४ वे, तर जाबेऊरला २५ वे सीडींग देण्यात आले होते. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. परंतु, गॉफने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जाबेऊरवर दबाव टाकला. त्यामुळे तिने हा सामना दोन सेटमध्ये जिंकत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अलेक्झांडर झ्वेरेवची आगेकूच 

- Advertisement -

जर्मनीच्या सहाव्या सीडेड अलेक्झांडर झ्वेरेवला फ्रेंच ओपनमध्ये आगेकूच करण्यात यश आले. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत त्याने जपानच्या काय निशिकोरीवर ६-४, ६-१, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मंगळवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झ्वेरेवपुढे स्पेनच्या आलेहान्द्रो डेव्हिडोव्हीच फोकिनाचे आव्हान असेल. फोकिनाने चौथ्या फेरीत अर्जेंटिनाच्या फेडेरिको डेल्बोनिसचा ६-४, ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला.

- Advertisement -