घरक्रीडाFrench Open 2021 : अंतिम सामन्यात १२ वर्षाच्या मुलाने केलं मार्गदर्शन; नोवाक...

French Open 2021 : अंतिम सामन्यात १२ वर्षाच्या मुलाने केलं मार्गदर्शन; नोवाक जोकोविचनं दिलं रॅकेट गिफ्ट

Subscribe

नोवाक जोकोविचनं त्सित्सिपासवर मात करत १९ वा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे केला आहे.

नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला पराभूत करत १९ वा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे केला आहे. पहिले दोन सेट गमावल्यानंतरही विजयश्री कशी खेचून आणावी, हे अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने दाखवून दिले. जोकोव्हिचने अंतिम फेरीत जोमाने मुसंडी मारत त्सित्सिपासवर ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी बाजी मारली. या सामन्यात जोकोविचला एका १२ वर्षाच्या मुलगा मार्गदर्शन करत होता. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जोकोविचनने त्याचं रॅकेट त्या लहान मुलाला दिलं

सामना झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सामना पाहणार्‍या १२ वर्षाच्या मुलाने त्यांना त्सित्सिपासला पराभूत करण्यासाठी योग्य रणनीती दिली. जोकोविचने दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. तो म्हणाला की सामन्यात त्या लहान मुलाचा आवाज माझ्या कानात गूंजत होता. विशेषत: जेव्हा मी दोन सेट गमावले. तो मला सतत प्रोत्साहन देत होता. तो प्रत्यक्षात मलाही रणनीती सांगत होता, असं जोकोविचनं सांगितलं.

- Advertisement -

जोकोविचनं सांगितलं की त्याचा चाहता त्याला आपली सर्व्हर पकडण्यास सांगत आहे, बॅकहँडवर घेऊन जा. तो खरोखर मला प्रशिक्षण देत होता. जोकोविच म्हणाला की तो चाहता मला खूप गोड आणि चांगला वाटला. म्हणूनच मला वाटले की सामन्यानंतर ज्याला रॅकेट द्यायचं आहे तो सर्वोत्कृष्ट व्यक्ती तो आहे. माझ्या पाठीशी राहिल्यामुळे व मला साथ दिल्याबद्दल त्याचे आभार, असं नोवाक जोकोविच म्हणाला.

- Advertisement -

दोन सेटनंतर जोकोविचची दमदार वापसी

त्सित्सिपासनेही जोकोविचला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आणि पहिले दोन सेट ७-६, ६-२ नी आपल्या नावे केले. यावेळी प्रेक्षकांना असं वाटत होतं की, जोकोविचचा आता फ्रेंच ओपनची अंतिम लढतीत पराभव होणार. परंतु, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोकोविचनं वापसी करत सामना आपल्या बाजूनं वळवला आणि पुढील तीन सेट आपल्या नावे करुन फ्रेंच ओपनच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -