Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा French Open : बार्बोरा क्रेजिकोव्हाला पहिलेवहिले जेतेपद

French Open : बार्बोरा क्रेजिकोव्हाला पहिलेवहिले जेतेपद

मागील पाच वर्षांत फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी क्रेजिकोव्हा ही तिसरी बिनसीडेड महिला टेनिसपटू ठरली.

Related Story

- Advertisement -

बिनसीडेड बार्बोरा क्रेजिकोव्हाने फ्रेंच ओपन ग्रँड स्पर्धेचे जेतेपद पटकावले. चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हाचे हे पहिलेवहिले ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्याच अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाला ६-१, २-६, ६-४ असे पराभूत केले. मागील पाच वर्षांत फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी क्रेजिकोव्हा ही तिसरी बिनसीडेड महिला टेनिसपटू ठरली. आता तिला महिला दुहेरीचेही जेतेपद पटकावण्याची संधी आहे. तसे झाल्यास २००० वर्षानंतर एकाच वर्षी फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरी आणि दुहेरीचे जेतेपद पटकावणारी क्रेजिकोव्हा ही मेरी पियर्सनंतर पहिलीच टेनिसपटू ठरेल.

दोघींचाही पहिलाच अंतिम सामना

क्रेजिकोव्हाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाचा ६-१, २-६, ६-४ असा पराभव केला. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळण्याची ही या दोघांचीही पहिलीच वेळ होती. या सामन्याची २५ वर्षीय क्रेजिकोव्हाने दमदार सुरुवात केली. तिने पहिला सेट ६-१ असा मोठ्या फरकाने जिंकला. परंतु, पाव्हल्यूचेन्कोव्हाने तिचा खेळ उंचावत दुसरा सेट ६-२ असा जिंकला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या सेटमध्ये गेला, ज्यात क्रेजिकोव्हाने ६-४ अशी बाजी मारत पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

- Advertisement -

- Advertisement -