Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा French Open : नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत; बेरांकीसचा उडवला धुव्वा 

French Open : नोवाक जोकोविच चौथ्या फेरीत; बेरांकीसचा उडवला धुव्वा 

जोकोविचने सलग १२ व्यांदा फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Related Story

- Advertisement -

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. अव्वल सीडेड सर्बियाच्या जोकोविचने तिसऱ्या फेरीच्या सामन्यात लिथुवेनियाच्या रिकार्डस बेरांकीसचा ६-१, ६-४, ६-१ असा धुव्वा उडवला. मागील वर्षी अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या जोकोविचला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याने या स्पर्धेची दमदार सुरुवात केली असून तिसऱ्या फेरीचा सामना त्याने अगदी सहजपणे, सरळ सेटमध्ये जिंकला. याआधी १८ वेळचा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच आणि बेरांकीस यांच्यात तीन सामने झाले होते. या तिन्ही सामन्यांत जोकोविचने बाजी मारली होती. तसेच आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत बेरांकीसला एकही सेट जिंकता आलेला नाही.

सर्व्हिस सहा वेळा मोडली

शनिवारी झालेला सामना जोकोविचने ६-१, ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये जिंकला. या सामन्यात जोकोविचने बेरांकीसची सर्व्हिस तब्बल सहा वेळा मोडली. त्यामुळे त्याने सहजपणे हा सामना जिंकून सलग १२ व्यांदा फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचने याआधी २०१६ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले असून त्याचा चौथ्या फेरीत इटलीच्या १९ वर्षीय लोरेंझो मुसेत्तीचे आव्हान असेल.

त्सीत्सीपासची इस्नरवर मात 

- Advertisement -

पाचव्या सीडेड ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासलाही चौथ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले. तिसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने अमेरिकेच्या जॉन इस्नरवर ५-७, ६-३, ७-६, ६-१ अशी मात केली. या सामन्यातील पहिला सेट त्सीत्सीपासने गमावला होता. परंतु, त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकले. त्यामुळे त्याने या सामन्यात बाजी मारत चौथी फेरी गाठली.

- Advertisement -