Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा French Open : उपांत्य फेरीत जोकोविच-नदाल आमनेसामने

French Open : उपांत्य फेरीत जोकोविच-नदाल आमनेसामने

फ्रेंच ओपनमध्ये या दोघांत आतापर्यंत आठ सामने झाले असून नदालने ७ सामन्यांत बाजी मारली आहे.

Related Story

- Advertisement -

अव्वल सीडेड सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची जोकोविचची ही ४० वी वेळ ठरली. या फेरीत त्याचा ‘क्ले कोर्टचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालशी सामना होईल. जोकोविच आणि नदाल यांच्यातील हा ५८ वा सामना असेल. मागील वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत जोकोविच आणि नदाल हेच आमनेसामने होते. या सामन्यात बाजी मारत नदालने तब्बल १३ व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते. परंतु, जोकोविचला शुक्रवारी या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे.

२० मिनिटे सामना थांबवावा लागला

जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या सीडेड इटलीच्या माटेयो बेरेटीनाचा ६-३, ६-२, ६-७, ७-५ असा पराभव केला. हा सामना रात्री ११ नंतरही सुरु राहिल्याने प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर जावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, फ्रांसमध्ये रात्री ११ नंतर कर्फ्यू असून फ्रेंच ओपनचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाही. त्यामुळे या सामन्याच्या चौथ्या सेटदरम्यान ५००० प्रेक्षक स्टेडियमच्या बाहेर पडेपर्यंत २० मिनिटे सामना थांबवावा लागला होता. परंतु, जोकोविचने संयम राखून हा सामना जिंकत ११ व्यांदा फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली.

नदालला विक्रम रचण्याची संधी 

- Advertisement -

आता शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत जोकोविचसमोर नदालचे आव्हान असेल. फ्रेंच ओपनमध्ये या दोघांत आतापर्यंत आठ सामने झाले असून नदालने ७ सामन्यांत बाजी मारली आहे. नदालला यंदाची स्पर्धा जिंकून सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. सध्या नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यात बरोबरी असून दोघांनाही २०-२० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे.

- Advertisement -