घरक्रीडाFrench Open : नदालचा झंझावाती खेळ; गॅस्केवर मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश

French Open : नदालचा झंझावाती खेळ; गॅस्केवर मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश

Subscribe

नदाल आणि गॅस्केमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले असून सर्व सामन्यांत नदालनेच बाजी मारली आहे.

‘क्ले कोर्टचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत झंझावाती खेळ सुरु ठेवला आहे. तब्बल १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या नदालने फ्रांसच्या रिचर्ड गॅस्केचा ६-०, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. नदाल आणि जागतिक क्रमवारीत ५३ व्या स्थानी असलेल्या गॅस्केमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले असून सर्व सामन्यांत नदालनेच बाजी मारली आहे. ‘सलग १६ सामने गमावण्यापेक्षा १६ सामने जिंकणे चांगले आहे, काही का? तुम्ही जेव्हा तुमच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग १६ सामने जिंकलेले असता, तेव्हा सामन्यापूर्वी तुमचा आत्मविश्वास दुणावलेला असतो,’ असे नदाल सामन्यानंतर म्हणाला.

सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ

रात्रीच्या सत्रात झालेल्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीत नदालने सुरुवातीपासूनच अप्रतिम खेळ केला. त्याने पहिला सेट ६-० असा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये २-५ असे पिछाडीवर पडल्यानंतर गॅस्केने चांगले पुनरागमन करत ५-५ अशी बरोबरी केली. मात्र, नदालने आपला खेळ पुन्हा उंचावत हा सेट ७-५ असा जिंकला. तसेच त्याने तिसरा सेट ६-२ असा जिंकत तिसरी फेरी गाठली.

- Advertisement -

अझारेंका आठ वर्षांनंतर चौथ्या फेरीत

बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. फ्रेंच ओपनची चौथी फेरी गाठण्याची ही अझारेंकाची २०१३ नंतर पहिलीच वेळ ठरली. आठ वर्षांपूर्वी तिला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -