घरक्रीडाविराटला कोणाकडून मेसेज अपेक्षित होते? सुनील गावसकर यांचा सवाल

विराटला कोणाकडून मेसेज अपेक्षित होते? सुनील गावसकर यांचा सवाल

Subscribe

मुंबई : महेंद्रसिंह धोनीबद्दल केलेल्या विधानामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हा धोनीशिवाय कुणाचाही मला मेसेज आला नाही, असे विराट कोहलीने म्हटले आहे. त्यावर भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाकडून मेसेज अपेक्षित होता, हे विराटने स्पष्ट करावे, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.

आशिया चषकातील सुपर 4मध्ये पाकिस्तानने 5 विकेट्स राखून भारताचा पराभव केला. या साममन्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जेव्हा कसोटीचे कर्णधारपद सोडल्यानंतर बऱ्याच जणांनी टीव्हीवरून किंवा बाहेरून सल्ले दिले. त्यांच्याकडे बोलायला भरपूर असते. अनेकांकडे माझा नंबर देखील आहे. पण नंबर असूनही त्यांचा एकही मेसेज आला नाही. माझ्याकडे फक्त एकाच व्यक्तीचा मेसेज आला, ज्याच्यासोबत मी खेळलो आणि तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी, असे विराट कोहलीने म्हटले होते.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील गावसकर यांनी यावरच टिप्पणी केली. विराट कोहलीने कोणाकडे अंगुलीनिर्देश केले, हे सांगणे कठीण आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर महेंद्रसिंह धोनी याचा मेसेज आल्याचे विराट कोहलीने सांगितले. पण ज्यांच्याकडून फोन येणे त्याला अपेक्षित होते, त्या खेळाडूचे नाव देखील विराटने सांगायला हवे. तसेच त्याला कशा प्रकारच्या मेसेजची प्रतीक्षा होती, हेही त्याने स्पष्ट करायला हवे, असे गावसकर म्हणाले.

विराट कोहली यांनी कोणाचे नाव घेतले असते तर, तू विराटला संपर्क केला होता की नाही, हे त्या व्यक्तीला विचारू शकतो. त्याला केवळ धोनीने मेसेज केला होता, असे त्याने सांगितल्याचे मला समजले, असे गावसकर म्हणाले.

- Advertisement -

ज्याच्याबरोबर विराट खेळला आहे, अशा माजी क्रिकेटपटूसंदर्भात विराट बोलत असेल तर, आपल्याला माहीत आहे की, टीव्हीवर कोण असते. त्याने त्या खेळाडूचे नाव घ्यायला हवे होते, ज्याचा उल्लेख त्याने केला. त्याला विचारा की, तू मेसेज केला नाहीस का? विराटने जर नाव जाहीर केले तर, विराटने कर्णधारपद सोडल्यावर ज्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या त्यांच्या दृष्टीने ते योग्य ठरेल, अशी पुश्तीही त्यांनी जोडली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -