घरक्रीडाIND vs AUS : बॅट-पॅडच्या फटीतून ट्रकही गेला असता; गावस्करांची भारतीय सलामीवीरांवर टीका 

IND vs AUS : बॅट-पॅडच्या फटीतून ट्रकही गेला असता; गावस्करांची भारतीय सलामीवीरांवर टीका 

Subscribe

भारताचे सलामीवीर ज्याप्रकारे बाद झाले, ते सुनील गावस्कर यांना अजिबातच आवडले नाही.  

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अनुभवी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांक अगरवालच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार? हा मोठा प्रश्न होता. भारतीय संघ व्यवस्थापनाने मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉला संधी देण्याचा निर्णय घेतला, पण पृथ्वीला पहिल्या डावात या संधीचा उपयोग करून घेता आला नाही. मिचेल स्टार्कने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. तसेच चांगल्या सुरुवातीनंतर मयांकही पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. भारताचे सलामीवीर ज्याप्रकारे बाद झाले, ते भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना अजिबातच आवडले नाही.

पृथ्वीच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप मोठी फट होती. हा सामन्याचा केवळ दुसरा चेंडू होता. डावाच्या सुरुवातीला फलंदाजाने चेंडू हळुवार हाताने आणि उशिरा खेळायचा असतो. कसोटी सामन्यात घाई करून चालत नाही. सुरुवातीलाच मोठा फटका मारायला गेल्यास बॅट आणि पॅडमध्ये मोठी फट निर्माण होते. चेंडू उशिरा स्विंग झाल्यास फलंदाज त्रिफळाचित होऊ शकतो किंवा बॅटची कड लागून चेंडू स्लिपमध्ये जाऊ शकतो. डावाच्या सुरुवातीला बॅट ही पॅडच्या अगदी जवळ असली पाहिजे. खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यावर तुम्ही फटके मारू शकता. मयांकने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, पण त्यानंतर तो हलक्या हाताने खेळला नाही. त्यामुळे त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठी फट निर्माण झाली. ही फट इतकी मोठी होती की त्यामधून ट्रकही गेला असता. पृथ्वी आणि मयांक या दोघांनीही सारखीच चूक केली, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -