घरक्रीडागौरीदत्तची शारदाश्रमवर मात

गौरीदत्तची शारदाश्रमवर मात

Subscribe

अमर हिंद शालेय कबड्डी

गौरीदत्त मित्तल हायस्कूलने शारदाश्रम विद्या मंदिर तांत्रिक शाळेचा पराभव करत दादरच्या अमर हिंद मंडळ आयोजित आंतरशालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तसेच आयईएस नाबर गुरुजी हायस्कूल, डॉ. अँटोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूल, आनश एज्युकेशन स्कूल, शारदाश्रम विद्या मंदिर मराठी शाळा, राजा शिवाजी विद्यालय या संघानीही आगेकूच केली.

अमर हिंद क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात गौरीदत्त मित्तल हायस्कूलने शारदाश्रम विद्या मंदिर तांत्रिक शाळेचा ४०-३८ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत शारदाश्रमकडे २ गुणांची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात दमदार खेळ करत गौरीदत्तने हा सामना जिंकला. या सामन्यात गौरीदत्तचा निखील शर्मा आणि शारदाश्रमचा शुभम यादव या चढाईपटूंनी अप्रतिम खेळ केला. आयईएस नाबर गुरुजी हायस्कूलने साहिल टिकेकरच्या अष्टपैलू खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलचे आव्हान २२-१४ असे संपुष्टात आणले, तसेच डॉ. अँटोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूलने साहिल सारंगच्या चांगल्या खेळामुळे श्री हशू अडवाणी हायस्कूलचा ४६-३२ असा पराभव केला. अडवाणी हायस्कूलचा अष्टपैलू कुंज पटेलने चांगली झुंज दिली.

- Advertisement -

आनश एज्युकेशन स्कूलने मध्यंतराला घेतलेल्या ८ गुणांच्या आघाडीमुळे शारदाश्रम विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेला ३७-३६ अशा फक्त एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. आनशतर्फे रोहितने तर शारदाश्रमतर्फे सुजल देशमुखने चढाईत चमक दाखविली. शारदाश्रम विद्या मंदिर मराठी शाळेने चढाईपटू कल्पेश भोसलेच्या चांगल्या खेळामुळे बालमोहन विद्या मंदिरला ३५-१८, मारवाडी विद्यालयाने मोहित शर्माच्या खेळामुळे श्री गणेश विद्यालयाला ५१-२४, तर राजा शिवाजी विद्यालयाने चढाईपटू यश बागलच्या खेळामुळे पीपल्स एज्युकेशन हायस्कूलला ३७-२१ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -