घरक्रीडाक्रिकेटर गौतम गंभीरने केली निवृत्ती जाहीर

क्रिकेटर गौतम गंभीरने केली निवृत्ती जाहीर

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून आपण खेळत असलेला सुंदर खेळ म्हणजेच क्रिकेट याच्या भारतीय संघातून आपण निवृत्त असल्याचे वृत्त एएनआयने त्यांच्या ट्विटवर अकाउंटवर दिले आहे. त्यामुळे यापुढे गौतमच्या चाहत्यांना मैदानावरील त्याची फलंदाजी आणि फटकेबाजी पाहता येणार नाही. २०११ साली भारताने जो वर्ल्ड कप जिंकला होता. त्या विजयाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून गौतम गंभीर भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.

- Advertisement -

पणजी ट्रॉफी स्पर्धेतील अांध्र प्रदेश विरुद्धचा पुढील सामना हा आपला क्रिकेट विश्वातील शेवटचा सामना असेल. त्यामुळे  दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातून क्रिकेटर म्हणून सुरु झालेला हा प्रवास आता शेवटाकडे आला आहे, असे गंभीरने म्हटले आहे.

- Advertisement -

३७ वर्षीय गौतमने २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण १५,०४१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना गौतम गंभीरने या संघाला २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. २०११ मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गंभीरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने १२२ चेंडूंमध्ये ९७ धावा ठोकून टीम इंडियाचे नाव वर्ल्डकपवर कोरले होते. १९८३ नंतर दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता. तसेच २००७ मध्ये टी२० वर्ल्डकपमधील विजेत्या टीम इंडियाचाही तो भाग होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -