घरक्रीडाISIS कडून येणाऱ्या धमक्यांना गौतम गंभीरचं प्रत्युत्तर, म्हणाला...

ISIS कडून येणाऱ्या धमक्यांना गौतम गंभीरचं प्रत्युत्तर, म्हणाला…

Subscribe

भारताचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ISIS कडून मिळणाऱ्या धमक्यांना खुलं आवाहन दिलं आहे. गंभीर देशातल्या विविध मुद्द्यांवर भाष्य करतात. आतापर्यंत त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, याच कारणामुळे आयसीसकडून येणाऱ्या धमक्यांना गंभीरनं प्रत्युत्तर दिलं आहे. मी कोणाला घाबरत नाही. अशा प्रकारचं विधान गंभीरने केलं आहे.

गौतम गंभीरचं प्रत्युत्तर

गंभीरने सांगितलं की, मला कोणाचीही भिती वाटत नाही. इंटेलिजेंस ब्यूरो या प्रकरणाची चौकशी करत आहे. परंतु मी माझं काम करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही आणि मी अशाच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतो. माझं लक्ष हे या आयोजनाच्या यशावर आहे.

- Advertisement -

गौतम गंभीरला ई-मेल पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलीसांकडून या प्रकरणाची चाचपणी केली जात आहे. ई-मेल मध्ये लिहिलंय की, आयपीएस अधिकारी श्वेता आमचं काही बिघडवू शकणार नाही. कारण पोलिसांच्या फौजेमध्ये आमच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. जर तुम्हाला आपल्या कुटुंबियांची काळजी वाटत असेल तर राजकीय आणि काश्मीरच्या मुद्द्यांपासून दूर रहा. अशा प्रकारच्या धमकीचं मेल पाठवण्यात आलं आहे.

आयसीस काश्मीरकडून तिसऱ्यांदा मेल

दरम्यान, गौतम गंभीरला आयसीस काश्मीरकडून तिसऱ्यांदा मेल पाठवण्यात आला होता. मेलमध्ये दिल्ली पोलिसांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. दुसऱ्या मेलमध्ये त्याच्या परिसरातील व्हिडिओ धमकीसोबत जोडण्यात आला होता. गंभीरने या प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल केली. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या घराजवळील सुरक्षेत वाढ केली होती.

- Advertisement -

गौतम गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी सामने, १४७ एकदिवसीय मालिका आणि ३७ टी-२० सामने खेळले आहेत. ४ हजारांच्या गंभीरने धावा पूर्ण केल्या आहेत. २००७ मध्ये गंभीरने टी-२० विश्वकपच्या अंतिम सामन्यात ७५ धावा आणि २०११ च्या वनडे विश्वकप अंतिममध्ये ९७ धावा पूर्ण केल्या आहेत. टीमला विश्वकप जिंकवून देण्यासाठी त्याने उत्तम कामगिरी केली आहे. तसेच गंभीरने २०१६ मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -