घरक्रीडाICC T20I WORLD CUP 2021 : गावस्करांचा वर्ल्डकप संघ जाहीर

ICC T20I WORLD CUP 2021 : गावस्करांचा वर्ल्डकप संघ जाहीर

Subscribe

शिखर धवन, श्रेयस अय्यरला डच्चू

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ या वर्षी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक राहिल्याने कोणते खेळाडू टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करतील याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.

जगातील प्रत्येक संघ टी -२० विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा करणार आहे. भारतीय दलाच्या अधिकृत घोषणेच्या आधी, दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. मात्र, त्यांनी डावखुरा फलंदाज शिखर धवनला संघातून वगळले आहे. त्यांचे असे म्हणायचे आहे, की रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२१ टी-२० विश्वचषकात भारतासाठी सलामीला फलंदाजी करतील.

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग मध्ये उजव्या हाताचा फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला सुनील गावस्करांनी वगळले आहे. विशेष म्हणजे शिखर धवन या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सर्वात आघाडी वर आहे म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये. त्याने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ५४.२८ च्या सरासरीने ३८० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ८ व्या क्रमांकावर आहे आणि विराट कोहली १५ व्या क्रमांकावर आहे.

रोहित व्यतिरिक्त, सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांची त्याच्या संघात निवड केली. यामध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचा समावेश आहे. जिथे सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. दुसरीकडे, पांड्या बंधू मधल्या फळीत आपली प्रतिभा दाखवतील. त्यांनी निवडलेल्या दोन अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

- Advertisement -

गावस्कर यांनी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांनाही आपल्या संघात समाविष्ट केले आहे. गावस्कर यांच्या संघात स्थान मिळवणारा युजवेंद्र चहल हा एकमेव फिरकीपटू आहे. कृणालचा संघात समावेश करण्यावर बोलताना गावस्कर म्हणाले, “तो एक अष्टपैलू खेळाडू आणि खूप अनुभवी खेळाडू आहे.

गावस्कर म्हणाले, “कृणाल पंड्याने गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे तो निश्चितच संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे. तो डावखुरा फलंदाज आहे, हा देखील एक फायदा आहे. भारताला टी -२० विश्वचषकात आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.

टी-२० विश्वचषक २०२१ साठी सुनील गावस्करांचा भारतीय संघ :

रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर (फिटनेसवर अवलंबून), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल.


हेही वाचा : १० वर्षांपेक्षा मोठी आहे धवनची बायको आयशा, हरभजनने करून दिली होती मैत्री; वाचा इनसाईड स्टोअरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -