घरक्रीडागतवर्षीच्या विजेत्यांचे पहिल्या फेरीतून बाहेर जाणे कायम

गतवर्षीच्या विजेत्यांचे पहिल्या फेरीतून बाहेर जाणे कायम

Subscribe

आतापर्यंत विश्वचषकातील १९९८, २००६, २०१० आणि आता २०१४ च्या विजेत्या संघांना या आपल्या पुढील विश्वचषकात बाद फेरी घाटता आलेली नाही

फिफा विश्वचषकातील एफ गटाच्या बाद फेरीत जाण्यासाठीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीला कोरियाने नमवत स्पर्धेबाहेर केले आहे. २-० च्या फरकाने कोरियाने जर्मनीवर विजय मिळवला आहे. मात्र या विजयामुळे गतविश्वचषक विजेत्यांची पुढील विश्वचषकात पहिल्या फेरीतूनच बाहेर जाण्याची परपंरा कायम राहिली आहे. १९९८ पासून सुरू झालेल्या या परंपरेला यावर्षी जर्मनीने कायम ठेवले आहे.

france in 1998
फ्रान्सच्या संघांने १९९८ साली विश्वचषक जिंकला होता

आतापर्यंत विश्वचषकातील १९९८, २००६, २०१० आणि आता २०१४ च्या विजेत्या संघांना या परंपरेचा भाग व्हावे लागले आहे. सर्वात आधी १९९८ साली फ्रान्सने विश्वचषक जिंकला. मात्र २००२ च्या विश्वचषकात त्यांना साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर जावे लागले. तर यानंतर २००६ साली विश्वचषक जिंकलेल्या इटलीचा २०१० सालचा विश्वचषकातला प्रवास साखळी सामन्यातच संपला. तर त्याचवेळी २०१० ला विश्वचषक विजेत्या स्पेनलाही २०१४ ला साखळी फेरीतून बाहेर पडावे लागले. याच परंपरेनुसार २०१४ च्या विजेत्या जर्मनीचा सध्याच्या विश्वचषकातील प्रवासही कोरियाविरूद्धच्या पराभवामुळे साखळी सामन्यातच संपला आहे.

- Advertisement -

असा झाला जर्मनीचा शेवटचा सामना

जर्मनी आणि कोरिया यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. अगदी सामन्याची ९० मिनिटे पूर्ण झाली तरीदेखील दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्यात अतिरीक्त ६ मिनिटं देण्यात आली. अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्या मिनिटाला कोरियाच्या कीम यंग-ग्वानने गोल करत संघांला १-० ची आघाडी मिळवून दिली. या गोलनेच जर्मनीच्या या विश्वचषकातील आशा मावळताना दिसल्या आणि त्यात शेवटच्या मिनिटाला कोरियाच्या ह्यूंग मीन याने गोल करत विजय कोरियाच्या नावे केला. याआधी जर्मनीने आपला पहिला सामना मेक्सिको विरोधात १-० ने हरला मात्र दुसऱ्या सामन्यात स्वीडनला २-१ ने हरवत जर्मनीने विश्वचषकात पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र कोरियाविरूद्धचा सामना २-० ने गमावला आणि त्यामुळे केवळ ३ गुण खात्यात असल्याने जर्मनीला विश्वचषकाच्या स्पर्धेबाहेर जावे लागले.

germany vs korea republic
कोरियाविरूद्ध जर्मनी सामन्यातील एक क्षण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -