घरक्रीडाजर्मनीच्या टोनी क्रूसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

जर्मनीच्या टोनी क्रूसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Subscribe

क्रूसने १०६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत जर्मनीचे प्रतिनिधित्व केले.

जर्मनीला सध्या सुरु असलेल्या युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने पराभूत केले होते. उप-उपांत्यपूर्व फेरीतील या पराभवामुळे जर्मनीचे युरो स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवाच्या काही दिवसांतच जर्मनीचा मधल्या फळीतील प्रमुख खेळाडू टोनी क्रूसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ‘मी जर्मनीसाठी १०६ सामने खेळलो. मात्र, यात आता एकाही सामन्याची भर पडणार नाही. मी १०९ सामने खेळेन आणि युरोच्या रूपात आणखी एक स्पर्धा जिंकेन अशी आशा होती. मी त्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले,’ असे क्रूस म्हणाला.

क्लब फुटबॉलवर लक्ष केंद्रित करणार

‘या (युरो) स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय मी खूप आधीच घेतला होता. पुढील वर्षी कतार येथे होणाऱ्या वर्ल्डकपपर्यंत खेळणे मला शक्य होणार नाही,’ असे क्रूस म्हणाला. आता तो केवळ क्लब फुटबॉलवर लक्ष केंद्रित करणार आहे. तो सध्या स्पेनमधील बलाढ्य संघ रियाल माद्रिदकडून खेळतो. तसेच त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा असल्याचे त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.

- Advertisement -

२०१४ फिफा वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य

३१ वर्षीय क्रूसने १०६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत जर्मनीचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांत त्याने १७ गोल आणि १९ असिस्टची नोंद केली. तसेच २०१४ मध्ये फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या जर्मनी संघाचा तो प्रमुख सदस्य होता. या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जर्मनीने यजमान ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवला होता आणि क्रूसने या सामन्यात दोन गोल करत जर्मनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -