घरक्रीडाऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य

ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य

Subscribe

भारताची आघाडीची जिम्नॅस्ट दीपा कर्मकार बाकू आणि दोहा येथे रंगणार्‍या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या दोन विश्वचषकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच या कामगिरीच्या जोरावर २०२० ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचे तिचे लक्ष्य आहे. दीपाने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकामध्ये व्हॉल्ट या प्रकारात तिने कांस्यपदक मिळवत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे आपले स्वप्न जिवंत ठेवले. एशियाड स्पर्धेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीनंतर दीपाची ती पहिली स्पर्धा होती आणि त्यात पदक मिळवत तिने दमदार पुनरागमन केले होते. दीपाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये मेलबर्न येथे झालेल्या विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता बाकू (१४ ते १७ मार्च) आणि दोहा (२० ते २३ मार्च) येथे होणार्‍या विश्वचषकात तिला चांगली कामगिरी करायची आहे.

ऑलिम्पिक पात्रतेसाठी यावेळी बरेच मार्ग आहे, यामध्ये विश्वचषकांचाही समावेश आहे. मला ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी जितके मार्ग आहेत, ते अवलंबण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात पदक मिळवल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. आता या विश्वचषकात चांगली कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये प्रवेशाच्या जवळ जाण्याचे माझे लक्ष्य आहे, असे दीपा म्हणाली.

- Advertisement -

दीपाचे प्रशिक्षक बिस्वेश्वर नंदी यांनी दीपाला जर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरायचे असेल तर तिला विश्वचषकाच्या पुढील ३-४ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकावेच लागेल असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -