घरक्रीडाकेकेआरच्या श्रेयस अय्यरला थेट लग्नाची मागणी; सामन्यादरम्यान तरुणी झाली फिदा

केकेआरच्या श्रेयस अय्यरला थेट लग्नाची मागणी; सामन्यादरम्यान तरुणी झाली फिदा

Subscribe

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर नेहमीच चर्चेत असतो. श्रेयसचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर तरेतरेचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच आता त्याच्या चाहत्यांमधील एका महिला चाहतीने त्याला थेट लग्नाची मागणी घातली आहे.

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर नेहमीच चर्चेत असतो. श्रेयसचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर तरेतरेचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच आता त्याच्या चाहत्यांमधील एका महिला चाहतीने त्याला थेट लग्नाची मागणी घातली आहे. या तरुणीने आयपीएलच्या सामन्यादरम्यानच श्रेयसला लग्न करशील का? असं एका पोस्टरद्वारे विचारलं.

“या तरूणीने हातात पोस्टर घेत माझ्याशी लग्न करशील का?” असं विचारलं आहे. याबाबतचा तरूणीचा हा फोटो कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तरुणीची ही मागणी पाहून नेटकरी तसेच केकेआरचे फॅन्स भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. केकेआरच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर या तरुणीचा फोटो अपलोड करण्यात आला आहे.

- Advertisement -

या तरुणीच्या हातात एक पोस्टर असून, यावर तिने “माझ्या आईला माझं लग्न करायचं आहे. त्यामुळे तिने मला मुलगा शोधायला सांगितला आहे. श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का?”, असं या तरुणईने पोस्टरवर लिहिलं आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएएल) 15व्या पर्वातील 30 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्यात चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 7 धावांनी पराभव झाला. तर फिरकीपटू युजवेंद्र चहलची धडाकेबाज गोलंदाजी आणि त्याने घेतलेल्या हॅट्रीकच्या जोरावर या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला.

- Advertisement -

केकेआरने विजयासाठी शेवटपर्यंत लढा दिला. त्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने ५१ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या. याच कारणामुळे केकेआरचा पराभव झाला असला तरी श्रेयसची वाहवा होत आहे. फक्त स्टेडियमच नव्हे तर स्टेडियमच्या बाहेरही श्रेयस अय्यरवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एका तरुणीने तर श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली आहे.


हेही वाचा – ठाणे महापालिका अॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेला विजेतेपद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -