घरक्रीडाजागतिक स्पर्धांपेक्षा द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य द्या -शास्त्री

जागतिक स्पर्धांपेक्षा द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य द्या -शास्त्री

Subscribe

करोनाच्या धोक्यामुळे सध्या बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. दोन महिन्यांपासून क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. आता हळूहळू पुन्हा क्रिकेट सुरू करण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. पुन्हा क्रिकेट सुरू झाल्यावर खेळाडूंना आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणि फॉर्मात येण्यासाठी काही काळ लागेल असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटते. अशा परिस्थितीत जागतिक स्पर्धांपेक्षा स्थानिक क्रिकेट आणि द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

इतक्यात जागतिक स्पर्धा घेण्याचा विचार होऊ नये असे मला वाटते. घरच्याच मैदानांवर खेळा. स्थानिक क्रिकेट पूर्ववत कसे होईल, आंतरराष्ट्रीय, प्रथम श्रेणी असे सर्वच स्तरांवरील क्रिकेट कसे पुन्हा सुरू करता येईल याचा विचार करा. तसेच द्विपक्षीय मालिकांपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात करा. भारताला विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिका यांच्यापैकी एकाचे आयोजन करायचे असल्यास आम्ही द्विपक्षीय मालिकेला पसंती देऊ. सध्याच्या परिस्थितीत १५ संघांपेक्षा एक संघ भारतात येणे योग्य ठरले. या एका संघाविरुद्ध आम्ही द्विपक्षीय मालिका खेळू, ज्याचे सामने एक किंवा दोन मैदानांवर होतील, असे शास्त्री यांनी नमूद केले.

- Advertisement -

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र, करोनामुळे ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्री बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -