घरक्रीडाऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर Glenn Maxwell भारताच्या Vini Raman सोबत विवाहबद्ध

ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर Glenn Maxwell भारताच्या Vini Raman सोबत विवाहबद्ध

Subscribe

भारतात 26 मार्च 2022 पासून आयपीएलची (IPL2022) सुरुवात होणार आहे. मात्र यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने( Glenn Maxwell) एक आनंदाची बातमी दिलीये. मॅक्सवेलने भारतीय वशांच्या विनी रमनशी ( Vini Raman )लग्नगाठ बांधली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही आनंदाची बातमी शेअर केलीये. विनी रमनने पतीसोबतचा यासह लग्नातील खास क्षणातील एक फोटो पोस्ट केलाय.

विनी रमनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले की, “मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल. 18.03.2022” फोटो पोस्ट केल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली. यासह अवघ्या काही वेळातच मॅक्सवेलच्या पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्स देखील आल्या आहेत

 

View this post on Instagram

 

A post shared by VINI (@vini.raman)

- Advertisement -

विनी रमन सोबत लग्नाची तारीख फिक्स झाल्याने मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामधून आपले नाव कमी केलं होतं. दरम्यान ,ऑस्ट्रेलियन संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानविरुद्ध 3 कसोटी यासह 3 एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यांची मालिका खेळाणार आहे.कसोटी मालिकेतील दोन सामने सध्या पार पडले आहेत. यासह दोन्ही सामने अनिर्णित राहीलेत. मॅक्सवेल यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलौर सोबत खेळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या रिलेशनशिपबाबत सांगायचे झाल्यास 2017 पासून ते एकमेकांसोबत आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात. 2020 मध्ये दोघांनीही एंगेजमेंट केली होती. विनी रमन मुळची चेन्नईच्या पश्चिम मम्बलम येथील आहे. मात्र विनीचा जन्म हा ऑस्ट्रेलियामध्येच झाला आहे. तिने ऑस्ट्रेलियामधूनच फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलंय. विनीच्या जन्मापूर्वीच तिचे आई वडील ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाले होते.

 


हे हि वाचा – Indw vs AusW world cup 2022 : भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाची सेमी फायनलसाठी आगेकूच

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -