घरक्रीडागोलफादेवीला जेतेपद; सिद्धेश पिंगळे स्पर्धेत सर्वोत्तम

गोलफादेवीला जेतेपद; सिद्धेश पिंगळे स्पर्धेत सर्वोत्तम

Subscribe

मुंबई शहरच्या गोलफादेवीने बंड्या मारुतीचा ३४-२९ असा पराभव करत उजाला मंडळ कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विजेत्या गोलफादेवीचा सिद्धेश पिंगळे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला ’मोटरबाईक’ देऊन गौरवण्यात आले.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच गोलफादेवीने चांगला खेळ केला. त्यांनीच पहिला लोण देत भक्कम आघाडी मिळवली. मध्यांतराला त्यांच्याकडे २०-१० अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकर आणि शुभम चौगुले यांनी आपल्या खेळाची गती वाढवत सामन्यात रंगत आणली. मात्र, गोलफादेवीने विजय आपल्या हातून निसटू दिला नाही. सिद्धेश पिंगळे, तुषार दुडिया यांच्या चतुरस्त्र खेळ करत गोलफादेवीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकर आणि गोलफादेवीच्या तुषार दुडिया यांना स्पर्धेतील अनुक्रमे चढाई आणि पकडीचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. दोघांना प्रत्येकी सायकल देऊन गौरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -