Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Neeraj Chopra : कौतुकास्पद! गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू

Neeraj Chopra : कौतुकास्पद! गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू

Subscribe

टोक्यो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा जगातील नंबर वन भालाफेकपटू बनला आहे. ही उत्कृष्ट अशी कामगिरी करणारा तो देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने काल(सोमवार) ही क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये नीरज चोप्रा १ हजार ४५५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला २२ गुणांनी मागे टाकले आहे. अँडरसनच्या नावावर सध्याच्या घडीला १४२२ गुण आहेत.

शेजारच्या देश असणाऱ्या पाकिस्तानचा थ्रोअर अर्शद नदीम क्रमवारीत पाचव्य स्थानावर कायम राहिला आहे. नदीमने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. परंतु नीरजला दुखापत झाल्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. दुसरीकडे भारताचा रोहित यादव १५व्या आणि डीपी मनू १७व्या स्थानावर असून टॉपृ२० मध्ये आहेत.

- Advertisement -

जागतिक क्रमवारीत ८ महिने होता दुसऱ्या क्रमांकावर

३० ऑगस्ट २०२२ पासून नीरज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. अँडरसन पीटर्स प्रथम क्रमांकाचा भालाफेक खेळाडू होता. पण नीरजने या महिन्यात ५ मे रोजी दोही येथे झालेल्या दिमांग लीगमध्ये ८८.६७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. तर जगातील नंबर वन अँडरसन पीटर्सने ८५.८८ मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले.

- Advertisement -

भालाफेकपटू नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्प्रर्धेचा गतविजेता आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. यावर्षीही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला आपले विजेतेपद राखायचे आहे.


हेही वाचा : IPL 2023: विराट कोहली RCB सोडून ‘या’ संघात जाणार? माजी खेळाडूने दिला सल्ला


 

- Advertisment -