घरक्रीडाचांगली कामगिरी लोक लवकर विसरतात!

चांगली कामगिरी लोक लवकर विसरतात!

Subscribe

राशिद खानचे विधान

क्रिकेट विश्वचषक सुरू होण्याआधी अफगाणिस्तानच्या संघाकडून झुंजार खेळाची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र, त्यांना या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्यांचे मुख्य खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी यांची कामगिरीही निराशाजनक आहे. या विश्वचषकाच्या ५ सामन्यांत राशिदने केवळ ३, तर नबीने केवळ ४ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असणार्‍या राशिदने ९ षटकांत ११० धावा खर्ची केल्या होत्या. त्यामुळे तो विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला होता. सामन्यानंतर त्याच्यावर टीकाही झाली. मात्र, राशिदला याबाबत फारसा विचार करायचा नाही. लोक एखाद्या खेळाडूची चांगली कामगिरी लवकर विसरतात, पण खराब कामगिरी बरोबर लक्षात ठेवतात, असे तो म्हणाला.

मी मागील सामन्याचा (इंग्लंडविरुद्ध) फार विचार केलेला नाही. लोक चांगली कामगिरी लगेच विसरतात, पण एखादा वाईट दिवस बरोबर लक्षात ठेवतात. राशिदने वाईट कामगिरी करण्याआधी १० दिवस किती चांगली कामगिरी केली होती याचा लोकांना विसर पडतो. मी त्या सामन्यात ज्या चुका केल्या त्यात सुधारणा करण्यावर भर दिला आहे. मला त्या चुका पुढील सामन्यांत करायच्या नाहीत. मात्र, लोकांच्या टीकेबाबत मी फारसा विचार करत नाही. मी माझा खेळ सुधारण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करत आहे, असे राशिद म्हणाला.

- Advertisement -

तसेच या स्पर्धेत अफगाणिस्तानला चांगले प्रदर्शन करण्यात का अपयश आले आहे, असे विचारले असता तो म्हणाला, आम्हाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यासारख्या मोठ्या संघाविरुद्ध सामने खेळण्याची फार कमी संधी मिळते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना आम्ही या विश्वचषकात खेळतो. त्यामुळे या सामन्यांत असणारा दबाव आमच्यासाठी नवा आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रचंड दबाव असतो आणि याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -