घरक्रीडाफिफा वुमन्स वर्ल्डकपचं गुगलने केलं सेलिब्रेशन

फिफा वुमन्स वर्ल्डकपचं गुगलने केलं सेलिब्रेशन

Subscribe

या वुमन्स फुटबॉल वर्ल्डकपचा आज अंतिम सामना असून अमेरिका आणि नेदरलँड या दोन्ही संघात हा अंतिम सामना रंगणार आहे.

७ जूनपासून सुरु झालेल्या वुमन्स फुटबॉल वर्ल्डकपचा आज अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना अमेरिका विरुद्ध नेदरलँड दरम्यान रंगणार आहे. म्हणून यानिमित्ताने गुगलने या दोन्ही संघाना प्रोत्साहन देण्यासाठी डूडल तयार करून सेलिब्रेशन केलं आहे.

यापूर्वी फिफा वुमन्स वर्ल्डकपची सुरुवात ७ जूनपासून झाली तेव्हा देखील गुगलने डूडल तयार केलं होत. हा फुटबॉल वर्ल्डकप फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्ल्डकपमध्ये २४ देशांच्या संघांचा समावेश होता. चिली, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलँड आणि जमैकाचे हे संघ पहिल्यांदाचा फिफा वुमन्स वर्ल्डकपमध्ये खेळले. आजचा अंतिम सामना हा पार्क ऑलिम्पिक लियोनॉइज स्टेडियम येथे भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता पार पडणार आहे. गुगलने केलेल्या डूडलने फुटबॉलप्रेमींचेही लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -