घरक्रीडागुगल डूडलवर दिलीप सरदेसाईंना मानवंदना

गुगल डूडलवर दिलीप सरदेसाईंना मानवंदना

Subscribe

दिलीप सरदेसाई यांचं क्रिकेट करिअर हे अकरा वर्षांचं होतं. भारताचे माजी बॅट्समन दिलीप सरदेसाई यांच्या ७८ व्या जन्मदिनानिमित्ती गुगलनं खास डूडलं साकारलं आहे.

गुगल डूडल नेहमीच महत्त्वाच्या व्यक्तींना मान देत असते. यामध्ये आता क्रिकेटर दिलीप सरदेसाईंच्या नावाच्या समावेश झाला आहे. भारताचे माजी बॅट्समन दिलीप सरदेसाई यांच्या ७८ व्या जन्मदिनानिमित्ती गुगलनं खास डूडलं साकारलं आहे. दिलीप सरदेसाई हे मूळचे गोव्याचे असून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे ते गोव्याचे पहिले खेळाडू होते. हा मान त्यांच्या नावावर आहे. त्यामुळं गुगलनं त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हे खास डूडल साकारलं. दिलीप सरदेसाईंचा भारतीय संघामध्ये मान होता. आपल्या करिअरची सुरवात आणि शेवट या खेळाडूनं इंग्लंडविरुद्धच केला.

दिलीप सरदेसाईंच्या करिअरचा आलेख

दिलीप सरदेसाई यांचं क्रिकेट करिअर हे अकरा वर्षांचं होतं. तर ३० टेस्ट मॅचमध्ये पाच शतकं त्यांनी झळकवली. यामध्ये २००१ रन्सचा त्यांनी काढल्या असून दोन द्विशतकांचा समावेश आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे दिलीप सरदेसाई यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केवळ दोनच सिक्स मारल्या. १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्ध मॅचची मालिका भारतानं जिंकली. या मालिका जिंकण्यामध्ये दिलीप सरदेसाई यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. साधारण ७० दशकातच भारतानं क्रिकेटमध्ये आपली पावलं भक्कम करायला सुरुवात केली आणि इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघांना त्यांच्याच भूमीत धूळ चारली. सरदेसाई यांनी १९७१ साली ओव्हल मैदानावर झालेल्या इंग्लंडच्या मॅचमध्ये ५४ व ४० धावांनी विजय मिळविला होता. १९७० ते १९९७२ च्या हंगामाच्या शेवटी त्यांनी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सरदेसाई यांनी रणजी ट्रॉफीचे १३ हंगाम गाजवले, त्यात १० फायनल्स समाविष्ट होत्या. सरदेसाईचा अंतिम प्रथम श्रेणीचा सामना १९७२-७३ साली मद्रास विरुद्ध रणजी ट्रॉफीचा होता, जो तिसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर संपला. दिलीप सरदेसाईंना छातीमध्ये संसर्ग झाल्यानंतर २३ जूनला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान २ जुलै, २००७ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -