घरक्रीडाटेनिस मी तुझा निरोप घेत आहे, मारिया शारापोवाची आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती

टेनिस मी तुझा निरोप घेत आहे, मारिया शारापोवाची आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती

Subscribe

वयाच्या १८ व्या वर्षी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल ठरलेली आणि ५ वेळा ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकवणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवाने बुधवारी  टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

रशियने टेनिसपटू मारिया शारापोवाने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या १८ व्या वर्षी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल ठरलेली आणि ५ वेळा ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकवणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवाने बुधवारी  टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मारियाने ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. शारापोवाने आपल्या कारकिर्दीत फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत २ तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे प्रत्येकी एक असे विजेतेपद पटकावले होते.

मारिया शारापोवाही जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. एका मासिकातील लेखात निवृत्ती घेताना ‘टेनिस मी तुझा निरोप घेत आहे, २८ वर्षानंतर मी एका नव्या शिखरावर चढाई करणार आहे आणि हे पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे’, असे तिने म्हटले आहे. मारियाने वयाच्या १७ व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले होते.

- Advertisement -

कसा होता प्रवास

स्पर्धेच्या काळात या टेनिसपटूने जागतिक क्रमवारीत आपले नाव गाजवले होते. मात्र मध्यंतरी २०१६ मध्ये उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी ठरल्यामुळे तिला १५ महिने टेनिसपासून लांब रहावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तिने टेनिसमध्ये कमबॅक केला परंतू एकाही मोठ्या स्पर्धेत तिला जेतेपद पटकवता आले नाही, या प्रकरणानंतर तिच्या खांदेदुखीच्या त्रासावर तिला मात करता आली नाही. बंदीनंतर पूर्वीसारखे खेळात पकड धकरणे तिला न जमल्याने तिची जागतिक टेनिस क्रमवारीतून महिला एकेरीत ३७३ व्या स्थानावरून घसरण झाल्याचे दिसले. २०१२ मध्ये तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपद पटकावले होते. यानंतर खांदेदुखीमुळे मारियाने अखेर निवृती जाहीर केली आहे.

टेनिसला रामराम ठोकताना म्हटले आहे की, ‘माझ्या यशाचे एक रहस्य म्हणजे मी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि कधी फार पुढचाही विचारही केला नाही. टेनिसने मला घडवले, मी माझे आयुष्य टेनिसला समर्पित केलेले त्यामुळे यानंतर मला माझा रोजचा सराव, सकाळी उठून कोर्टवर जाणे या आणि असा अनेक गोष्टी मी कधीच विसरणार नाही. मी सराव करताना कायम माझ्यासोबत असणारे माझे वडिल मी जिंकले किंवा पराभूत झाले तरीही ते मला हस्तालोंदन करत असत. त्यामुळे मी कधीच हे दिवस विसरू शकत नाही’, असे तिने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -