घरक्रीडाटीम इंडियाला मोठा दिलासा, वनडे-टी२० मालिकेतून इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज बाहेर

टीम इंडियाला मोठा दिलासा, वनडे-टी२० मालिकेतून इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज बाहेर

Subscribe

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर दोन्ही देशांदरम्यान तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. परंतु टीम इंडियासाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल राशीद टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीये. तसेच तो यॉर्कशायरकडून टी-२० ब्लास्टमध्येही खेळणार नाहीये. राशीदने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि यॉर्कशायरकडे हजसाठी रजा मागितली होती, ती आता मंजूर झाली आहे. राशिद उद्याच्या शनिवारी मक्केला रवाना होणार आहे.

राशीद जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लिश संघात सामील होईल, अशी ईसीबीला आशा आहे. राशीदने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, मला हजला जायचे होते. पण यासाठी वेळ नव्हता. तथापि, यावर्षी मला असे वाटले की, मी काहीतरी केले पाहिजे, म्हणून मी त्यासाठी तयारी केली.

- Advertisement -

राशीद जाणार हज यात्रेला

राशीद पुढे म्हणाला की, मी याबद्दल ईसीबी आणि यॉर्कशायरशी बोललो आणि त्यांनी माझा मुद्दा समजून घेतला आणि सांगितले की, मला पाहिजे तेव्हा मी जाऊ शकतो आणि परत येऊ शकतो. आता मी आणि माझी पत्नी काही आठवड्यांसाठी हज यात्रेला जाणार आहोत. हा आमचा मोठा क्षण आहे. प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी गोष्ट असते. पण इस्लामसाठी आणि मुस्लिम असणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. टीम इंडियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचा विचार माझ्या मनात आला नाही, मला फक्त आता हजला जावे असे वाटले.

मॅट पार्किन्सनला मिळू शकते संधी

राशीदच्या अनुपस्थितीत मॅट पार्किन्सनला टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मविआ सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंनी गमावले नियंत्रण, आता पुढे काय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -