घरक्रीडाGT vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 5 धावांनी विजय; पांड्याची अर्धशतकी...

GT vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 5 धावांनी विजय; पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ

Subscribe

नवी दिल्ली : IPL 2023 च्या 44 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) संघाने कमी धावसंख्येचा बचाव करताना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. इशांत शर्माने शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना 6 धावा देत 1 विकेट घेतली आणि दिल्ली संघाला विजय मिळवून दिला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण अवघ्या 23 धावांवर दिल्लीचा अर्धा संघ माघारी परतला होता. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल आणि अमन खान यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. परंतु अक्षर पटेल मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. अमन खान आणि रिपल पटेल यांनी सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली आणि अमन खान आपले अर्धशतक पूर्ण करून बाद झाला, त्याने 44 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 51 धावा केल्या. याशिवाय रिपल पटेल याने 13 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावांचे योगदान दिले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावत 130 धावा केल्या. यावेळी गुजरातकडून मोहम्मद शमीने 4 षटके गोलंदाजी करताना 11 धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहितम शर्मा 2 आमि राशिद खान याला 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेल्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात संघाचीही खराब सुरूवात झाली. 32 धावांवर गुजरातच्या 4 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागिदारी केली. शेवटच्या तीन षटकात गुजरातला विजयासाठी 37 धावांची गरज होती. परंतु 18 व्या षटकात खलील अहमद गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अभिनव मनोहरला बाद केले. अभिनव मनोहर 33 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा करत बाद झाला आणि या षटकात खलीलने फक्त चार धावा दिल्या.

गुजरातला शेवटच्या दोन षटकात 33 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतिया मैदानावर होते. 19 व्या षटकात एनरीच गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने पहिल्या तीन चेंडूत तीन धावा दिल्या, पण यानंतर तेवतियाने शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकत गुजरातला विजयाच्या जवळ आणले. नॉर्टजेने 19व्या षटकात 21 धावा दिल्या. अशा स्थितीत इशांत शर्मासमोर 12 धावा वाचवण्याचे लक्ष्य होते.

- Advertisement -

इशांतने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर तेवतियाला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे शेवटच्या 3 चेंडूत 9 धावांची गरज असताना तेवतियाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बाद झाला. त्याने 7 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या राशिद खानने पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्यामुळे गुजरातला शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती, परंतु इशांत शर्माने 1 धावा दिल्यामुळे गुजरातला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. इशांतने 12 धावांचा बचाव करताना फक्त सहा धावा देत 1 विकेट घेतली. कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद राहत 53 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 59 धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -