IPL 2022 : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स-लखनऊ सुपर जायंट्स पहिल्यांदाच मैदानात, लखनऊवर गोलंदाजांचा भेदक मारा

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पदार्पण केलंय. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ सहभागी झाले आहेत. आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ हे दोन संघ पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत. परंतु गुजरातच्या गोलंदाजांनी आपल्या बॉलवर मजबूत पकड ठेवली असून लखनऊचे बेहाल केले आहेत.

गुजरात संघाचं नेतृत्व हे हार्दिक पांड्या तर लखनऊचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची स्थिती पाहिली असता गुजरातच्या १५ ओव्हर्स पूर्ण झाल्या असून लखनऊच्या १०९ धावा पूर्ण झाल्या आहेत. तसेच लखनऊने ४ गडी गमावले आहेत.

लखनऊचा कर्णधार केएल राहुलसाठी आयपीएलची सुरूवात चांगली झालेली नाही. कारण गुजरात टायटन्सने पहिल्याच बॉलवर लखनऊ सुपर जायंट्सला झटका दिला. गोलंदाज मोहम्मद शामीने क्विंटन डि कॉक आणि मनीष पांडेला क्लीन बोल्ड केलं. तसेच वरुण एरॉनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने लुइसचा १० धावांवर झेल घेतला. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याने देखील गोलंदाजी केली.

लखनऊची टीम आयपीएल इतिहासातलही सगळ्यात महागडी टीम आहे. आयपीएलच्या लिलावाआधी गुजरातने हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांच्यावर बोली लावली होती. तर लखनऊने केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिष्णोई यांच्यासोबत करार केला होता.

दरम्यान, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही भाऊ मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत होते. परंतु हार्दिक पांड्या आता गुजरातमधून खेळत असून कृणाल पांड्या लखऊन खेळताना दिसत आहे.याचाच अर्थ हे दोन्ही भाऊ पहिल्यांदाच आमनेसामने भिडले आहेत. त्यामुळे या दौघांपैकी कोणता संघ जिंकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

असे आहेत दोन्ही उभय संघ –

लखनऊ सुपर जायंट्स

केएल राहुल, क्विंटन डिकॉक, एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मोहसीन खान, आयुष बदोनी, दुष्मंता चमीरा, रवी बिष्णोई, आवेश खान

गुजरात टायटन्स

शुभमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण एरॉन, मोहम्मद शमी


हेही वाचा : The Kashmir Files : काश्मीरी पंडितांना चित्रपटाची नाही तर पुनर्वसनाची गरज, द काश्मीर फाईल्सवरून केजरीवालांनी सुनावले