IPL 2022, Gujarat Titans: IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या संघाचे नाव गुजरात टायटन्स, अहमदाबाद फ्रेंचायझीची गुगली

Gujarat Titans IPL 2022 ahmedabad team gave Gujarat Titans name for hardik pandya team in ipl
IPL 2022, Gujarat Titans: IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या संघाचे नाव गुजरात टायटन्स, अहमदाबाद फ्रेंचायझीची गुगली

इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या अहमदाबाद संघाने टीमच्या नावाची घोषणा केली आहे. अहमदाबाद टीम गुजरात टायटन्सच्या नावाने मैदानात उतरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघाचे नाव गुलदस्त्यात होते. संघाच्या नावावरुन अनेक चर्चा सुरु होत्या. आता काही दिवस असताना अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे.

आयपीएल २०२२ च्या हंगामात गुजरात टायटन्स पहिल्यांदाच सहभागी होत आहे. या संघाने स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. सीवीसी ग्रुपची टीम अहमदाबादने हार्दिक पांड्याच्याव्यतिरिक्त राशिद खान आणि शुभमन गिलला संधी दिली आहे.

अहमदाबाद फ्रेंचायझीचे सिद्धार्थ पटेल यांनी संघाचे नाव कसे ठेवण्यात आले याबाबतची माहिती दिली. गुजरात टायटन्सबाबत खूप माहिती आणि रिसर्च करण्यात आला. यासाठी एका एजन्सीला काम दिले होते. संपूर्ण गुजरातचे प्रतिनिधीत्व कसे करता येईल यावर आमचा भर होता.

गुजरात टायन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, माझे कुटुंब गुजरातचे आहे. सर्व लोकं गुजरातला राहतात. जेव्हा सगळ्यांना समजले की, मी गुजरातच्या संघाचे नेतृत्व करतो आहे तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आणि गर्व दिसत होता.

गुजरातच्या संघाने कर्णधार हार्दिक पांड्याला १५ करोड, राशिद खानला १५ करोड आणि शुभमन गिलला ८ करोड रुपये देऊन संघात घेतलं आहे. संघाकडे सध्या ५२ करोड रुपये आहेत. या पैशांचा वापर ऑक्शनमध्ये करण्यात येईल.

गुजरात टायटन्ससोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटकर आशीष नेहरा व्यतिरिक्त इतर प्रशिक्षक जुळले आहेत. तसेच भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यास साथ देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन मेंटर म्हणून संघासोबत असतील. तसेच विक्रम सोलंकी टीमचे डायरेक्टर असतील.


हेही वाचा : Ranji Trophy 2022: रणजी करंडक स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणे आणि पुजारा येणार आमनेसामने, अर्जुन तेंडुलकरची मुंबईसाठी निवड