घरक्रीडारहाणे कौंटीत खेळणार हॅम्पशायरकडून

रहाणे कौंटीत खेळणार हॅम्पशायरकडून

Subscribe

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यंदा कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने हॅम्पशायर संघाची करार केला असून तो यासंघाकडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू असणार आहे. याआधी या संघाकडून गॉर्डन ग्रिनीज, माल्कम मार्शल, शेन वॉर्न, केविन पीटरसन असे महान खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे रहाणे आता या संघाकडून खेळण्यास खूप उत्सुकआहे.

हॅम्पशायरसारख्या मोठ्या संघाकडून खेळणारा मी पहिला भारतीय क्रिकेटपटू असणार आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे.मला आशा आहे की मी खूप धावा करू शकेन आणि आम्ही संघ म्हणून बरेच सामने जिंकू शकू. बीसीसीआयने मला कौंटी क्रिकेटखेळण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे रहाणे म्हणाला.

- Advertisement -

रहाणे सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. ही स्पर्धा संपल्यावर तो इंग्लंडसाठी रवाना होईल. तो साधारण मे महिन्याच्या मध्यापासून ते जुलैपर्यंत एकूण ८ कौंटी सामने खेळणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासोबतवेस्ट इंडिजला जाईल. रहाणे विश्वचषकासाठी निवड झालेल्या द.आफ्रिकेच्या एडन मार्करमच्या जागी हॅम्पशायरकडून खेळणार आहे.

मागील काही काळापासून बरेच भारतीय खेळाडू कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. चेतेश्वर पुजारा मागील २-३ वर्षे कौंटीमध्ये खेळला आहे, तर इशांत शर्मा आणि मुरली विजय हे दोघे मागील वर्षी कौंटी क्रिकेट खेळताना दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -